८२ नव्या पदांच्या निर्मितीला राज्य गृहखात्याची मान्यता
पणजी : गोवा पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. दोन निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक आणि इतर मिळून एकूण ५६५ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली असून, यातील ६० जणांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
दरम्यान, नुकतीच भरती झालेल्या ८५९ पोलीस कॉन्स्टेबल्सची विविध पोलीस स्थानकांत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्य गृहमंत्रालयाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २७ आणि हेड कॉन्स्टेबल (चालक) पदासाठी ५५, अशा एकूण ८२ नव्या पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. या बदलांमुळे पोलीस खात्याचे काम. अधिक गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.