अहमदाबाद दुर्घटना : मेसमधील हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये आली समोर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th June, 12:25 pm
अहमदाबाद दुर्घटना : मेसमधील हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये आली समोर

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडिया ड्रीमलाइनर विमान गुरुवारी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या मेस इमारतीवर आदळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे.



विमानात २३० प्रवासी, २ वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स असे एकूण २४२ जण होते. त्यातील केवळ एक प्रवासी जिवंत वाचल्याचे समोर आले आहे. विमान कोसळताना त्याचा मागचा भाग मेसच्या इमारतीवर आदळला. या वेळी मेसमध्ये विद्यार्थी जेवण करत होते. 

भीषण दृश्याचा व्हिडीओ समोर

या अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात आगीचे लोळ, धूर आणि उद्भवलेली भयावह स्थिती दिसत आहे. विद्यार्थी एकमेकांना मदत करतानाचे, ढिगाऱ्यात अडकलेल्यांचे जीव वाचवत असल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.



मेसमध्ये मोठा विनाश, मृतदेहांचे अवशेषही सापडले

विमानाच्या काही भागांनी इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना भाजले असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत किती विद्यार्थी जखमी किंवा मृत झाले, याचा अधिकृत तपशील मिळालेला नाही. मात्र, घटनास्थळी विमानातील काही प्रवाशांचे मृतदेहाचे अवशेष सापडल्याचे सांगण्यात आले.




फक्त ४० सेकंदांत घडली दुर्घटना

उड्डाण केल्यानंतर अवघ्या ४० सेकंदांतच विमान कोसळले आणि आग लागून ते आगीत भस्मसात झाले. अपघातस्थळी मदतकार्य सुरू असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना केवळ गुजरातसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी हादरवून टाकणारी आहे. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.


हेही वाचा