♟️ स्टावेंजर : बुद्धिबळ विश्वात सध्या ज्या एकाच नावाची चर्चा आहे
स्टावेंजर : बुद्धिबळ विश्वात सध्या ज्या एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे भारताचा उदयोन्मुख तारा आणि विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत त्याने आपल्या अद्भुत कामगिरीने सर्वांनाच थक्क केले आहे. नवव्या फेरीत त्याने चीनच्या बलाढ्य वेई यी चा पराभव करत स्पर्धेतील आपला चौथा विजय साकारला आणि जेतेपदाच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले.
या विजयानंतर गुकेशचे गुण १४.५ पर्यंत पोचले असून, तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बुद्धिबळाचा सम्राट मॅग्नस कार्लसनपेक्षा केवळ अर्धा गुण मागे आहे. आता गुकेशने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले असून, अंतिम फेऱ्यांमध्ये तो कार्लसनला थेट आव्हान देणार हे निश्चित झाले आहे.