मिराबाग-सावर्डे येथील बंधारा लोकांच्या माथी मारू नका!

सोलयेवासीयांचा इशारा : नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात धोका शक्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th May, 11:33 pm
मिराबाग-सावर्डे येथील बंधारा लोकांच्या माथी मारू नका!

सोलये येथील सभेला उपस्थित ग्रामस्थ.

सांगे :
गेल्या अकरा महिन्यांपासून गाजत असलेल्या मिराबाग-सावर्डे येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध होत आहे. यापूर्वी मिराबागसह सांगे येथील मुगोळी गावात सभा घेऊन बंधाऱ्याला गावातील लोकांनी विरोध दर्शविला होता. शुक्रवारी रात्री सोलये गावात सभा घेण्यात आली. बंधारा जबरदस्तीने लोकांच्या माथी मारला जाऊ नये. सावर्डे, कुडचडे आणि सांगे मतदारसंघातील नदीकाठच्या घरांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा यावेळी करण्यात आला.
सोलेये गाव नदीच्या काठावर आहे. जलस्रोतमंत्री या बंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात या ठिकाणचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप गौरेश गावकर यांनी केला.

बंधाऱ्याबाबत लोक अंधारात!
नगरसेविका योलांडा पेरेरा यांनी सांगितले की, मिराबाग, फळणे, मुगोळी, सोलेये या चार गावात या बंधाऱ्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. पलीकडे इतर भागातही याचा परिणाम होऊ शकतो. लोकांना विश्वासात न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यात नदीला पूर येतो. भीतीच्या वातावरणात दिवस काढावे लागतात. असे असताना लोकांची पर्वा न करता बंधारा बांधला जात आहे.      

हेही वाचा