मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
डिचोली : भोमा येथे प्रस्तावित बायपास रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी साखळी येथे भोमवासीयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, भोममधील महामार्गात स्थानिकांचे एकही घर किंवा मंदिर जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल. तसेच याबाबत नागरिकांचा गैरसमजही दूर केला जाईल असे आश्वासान मुख्यमंत्र्यांनी दिले.
तसेच नागरिकांनी आपले मुद्दे उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले. या विषयावर सोमवारी सकाळी १०.३० वाजता मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत तांत्रिक पथकाकडून नागरिकांसाठी सादरीकरण केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.