सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा थरारक विजय

मिचेल स्टार्कची अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 12:39 am
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा थरारक विजय

दिल्ली : दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ३२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने २० षटकांत ५ गडी गमावून १८८ धावा केल्या. यंदाच्या आयपीेएलमध्ये पहिला सुपर अोव्हरचा सामना बुधवारी पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला दोन धावा हव्या होत्या. पण मिचेल स्टार्कने एकच धाव दिली आणि खेळाडू रन आऊट झाल्यामुळे हा सामान सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांचे २० षचकांत समान १८८ धावा. सुपर ओव्हरमध्ये हा सामना दिल्लीने जिंकला.

दिल्लाचा सलामीवीर जॅक फ्रेजर मॅकग्रुक याने ६ चेंडूत ९ धावा करून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर करुण नायर याला भोपळाही फोडता आला नाही. तर अभिषेक पोरेल याने दिल्लीसाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने ३० पेक्षा अधिक धावा केल्या.

अभिषेक पोरेल याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४९ रन्स केल्या. केएल राहुल याने संथ खेळी केली. केएल राहुलने वनडे स्टाईल बॅटिंग केली. केएलने ३२ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. कॅप्टन अक्षर पटेल याने १४ चेंडूत २४२.८६ च्या स्ट्राईक रेटने ३४ धावा केल्या. अक्षरच्या या खेळीत २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा ही जोडी नाबाद परतली. ट्रिस्टनने १८ चेंडूत २ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. तर आशुतोषने ११ चेंडूत १५ धावा केल्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने २ गडी बाद केले. तर महीश तीक्षणा आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दिल्लीच्या १८९ धावांचा पाठलाग करताना संजून सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांनी संधाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी ६१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर संजूला दुखापत झाली आणि त्याने मैदान सोडले. त्यानंतर फलंदाजीला आलेला रायन पराग फक्त आठ धावा करू शकला. पण दुसरीकडे यशस्वी जयस्वाल दमदार फटकेबाजी करत होता आणि त्याने अर्धशतक झळकावले होते. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर तो जास्त काळ खेळू शकला नाही. यशस्वीने यावेळी ३७ चेंडूंत ५१ धावा केल्या. रियान परागने ८ धावा केल्या. नितीश राणाने ५१ तर ध्रुव जुरेलने २६ धांवांचे योगदान दिले. हेटमायरने ९ चेंडूत १५ धावा केल्या.

दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवट गोलंदाजी केल्याने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. राजस्थानकडून मैदानात ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर ही जोडी होती. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने २० वे षटक टाकले. राजस्थानला शेवटच्या षटकामध्ये ९ धावांची गरज होती. एक एक चेंडू कमी होत होता. तर दुसर्‍या बाजूला थरार वाढत होता. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. मात्र राजस्थान २ धावा करण्यात अपयशी ठरली.

ध्रुव जुरेलने शेवटच्या बॉलवर फटका मारला. ध्रुवने १ धाव पूर्ण केली. त्यानंतर ध्रुव दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने धाव घेतली. मात्र अक्षर पटेल याने अचूक थ्रो केला. अक्षरचा हा थ्रो विकेटकीपर केएल राहुल याने अचूक पकडला आणि ध्रुवला रन आऊट केले. अशाप्रकारे सामना २० षटकानंतर ४ बाद १८८ धावांवर बरोबरी सुटला आणि या १८ व्या सिजनमधील पहिली मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हर खेळविण्यात आली.

मिचेल स्टार्कने सुपर ओव्हरमध्ये राजस्थानच्या फलंदाजांना अकरा धावाच करू दिल्या. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. १२ धावांचा पाठलाग करताना राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. थ्रो अचूक असता तर राहुल रनआऊट झाला असता. दुसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर राहुलने एक धाव मिळवली. चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्जने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.मिचेल स्टार्कने टाकलेल्या षटकात शिमोरन हेटमायरला धाव काढता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव काढली. चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलने चौकार लगावला. पंचांनी नोबॉलचा कौल दिला. अशा रीतीने एका चेंडूवर पाच धावा निघाल्या. पुढच्या चेंडूवर रियान पराग रनआऊट झाला. पाचव्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वाल रनआऊट झाला आणि राजस्थानचा डाव आटोपला. राजस्थानने ११ धावा केल्या.

संदीपच्या नावावर नकोसा विक्रम

संदीप शर्माने शेवटच्या षटकामध्ये तब्बल ११ चेंडू फेकले. वाईड, शून्य, वाईड, वाईड, वाईड, २ नॉ बॉल, ४, ६, १, १, २ अशा प्रकारे संदीप शर्माने शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे नाव जोडले गेले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटक टाकणारे गोलंदाज -

तुषार देशपांडे - ११ चेंडू - विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, २०२३

मोहम्मद सिराज - ११ चेंडू - विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२३

शार्दूल ठाकूर - ११ चेंडू - विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, २०२५

संदीप शर्मा - ११ चेंडू - विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०२५

संजू सॅमसन रिटायर हर्ट
आज दिल्लीच्या संघाने सामान्यतः पहिले फलंदाजी केली आणि या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर १८९ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्यांनंतर दुसऱ्या डावांमध्ये राजस्थानचा संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण काही वेळानंतर संजू सॅमसन एक शॉट मारताना दुखापत झाली आणि लगेच मैदानावर फिझिओ आले होते. त्यावेळी त्याला तपासले आणि तो पुन्हा फलंदाजीला मैदानात उभा राहिला. पण पुन्हा त्याने शॉट मारला आणि त्याची दुखापत वाढली आणि त्याने मैदान सोडले.