दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार थरार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15th March, 12:21 am
दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना आज

मुंबई : मुंबई इंडियन्स वुमन्सने गुरुवारी, १३ मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली. तर त्याआधी दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता होण्यासाठी मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात थरार रंगणार आहे. शनिवारी १५ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायं. ७.३० वा. होणार आहे.
डब्ल्यूपीएल २०२५ हंगामासाठी बीसीसीआयकडून बक्षीसाची रक्कम जाहीर झालेली नाही. परंतु मागच्या हंगामातील बक्षीसाची रक्कम यावेळीही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागच्या हंगामातील बक्षीसानुसार विजेत्या संघाला ६ कोटी रूपये व उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिसऱ्या हंगामातील चषकावर कोणता संघ नाव कोरतो हे पाहणे महतत्वाचे ठरले आहे.
मुंबई इंडियन्स
हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.
दिल्ली कॅपिटल्स
मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेहा दीप्ती, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी कश्यप, सारा ब्राइस, तानिया भाटिया आणि तीतस साधू.