खेळाडूंची शानदार कामगिरी : पणजी पँथर्स क्लब, पणजी गणेशोत्सव समितीतर्फे आयोजन
पणजी : राज्य मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत बेट्टी, तानाजी आणि मंजिरी यांनी तिहेरी किताब पटकावला तर वृषाली डॉ. मंजू, पराग, अमित, आग्नेलो, कमलेश, रुपचंद्र विनिता यांनी दुहेरी किताब मिळवला. स्पर्धेत गोव्यातील ज्येष्ठ खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. स्पर्धेचे आयोजन पणजी पँथर्स क्लब आणि पणजी गणेशोत्सव समिती यांनी इनडोअर स्टेडियम, कांपाल-पणजी येथे केले होते.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महत्त्वाची निवड स्पर्धा
गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा या मार्चमध्ये गोव्यात आयोजित होणाऱ्या मास्टर्स (वेटरन) राष्ट्रीय स्पर्धेसाठी एक महत्त्वाची निवड स्पर्धा होती. तानाजी सावंत, बेट्टी दुर्रादो आणि मंजिरी मोक्ताली यांनी प्रतिष्ठित तिहेरी मुकुट मिळवले. वृषाली कार्दोझ, डॉ. मंजू खांडेपारकर, पराग चौहान, अमित कक्कर, आग्नेलो दा कुन्हा, कमलेश कांजी, रुपचंद्र हुमरसकर आणि विनीता आडपाईकर यांनी दुहेरी मुकुट पटकावला.
स्पर्धेतील विजेते
प्रतिक महाजन (मिश्र एकेरी ३५+), मंजू खांडेपारकर (महिला एकेरी ३५+), जतिंदर सिंग/नवनीत नास्नोडकर (पुरुष दुहेरी ३५+), अमित कक्कर/प्रीतिका कक्कर (मिश्र दुहेरी ३५+), पंकज नाईक (पुरुष एकेरी ३५+), पंकज नाईक (पुरुष एकेरी ४०+), बेट्टी दुर्रादो (महिला एकेरी ४०+), अमित कक्कर/कृष्णानंद वेर्णेकर (पुरुष दुहेरी ४०+), अँटोनेटा मार्केला/बेट्टी दुर्रादो (महिला दुहेरी ४०+), पॅट्रिक गोन्साल्विस/बेट्टी दुर्रादो (मिश्र दुहेरी ४०+), पराग चौहान (पुरुष एकेरी ४५+), विनीता आडपाईकर (महिला एकेरी ४५+), कमलेश कांजी/पराग चौहान (पुरुष दुहेरी ४५+), सुप्रिया पै कुचेलकर/विनीता आडपाईकर (महिला दुहेरी ४५+), कमलेश कांजी/मंजिरी मोक्ताली (मिश्र दुहेरी ४५+), कृष्णप्रसाद नाईक (पुरुष एकेरी ५०+), अर्चना मार्या (महिला एकेरी ५०+), किशोर रघुबंस/महेश पाऊस्कर (पुरुष दुहेरी ५०+), वोलिसियानो दुर्रादो (पुरुष एकेरी ५५+), मंजिरी मोक्ताली (महिला एकेरी ५५+), अग्नेलो दा कुन्हा/अनिरुध भोसले (पुरुष दुहेरी ५५+), मंजिरी मोक्ताली/वृषाली कार्दोझ (महिला दुहेरी ५५+), आग्नेलो दा कुन्हा/वृषाली कार्दोझ (मिश्र दुहेरी ५५+), रूपचंद्र हमरस्कर (पुरुष अग्नेलो दा कुन्हा/अनिरुधा भोसले (पुरुष दुहेरी ५५+)
मंजिरी मोक्ताली/वृषाली कार्डोझो (महिला दुहेरी ५५+), अग्नेलो दा कुन्हा/वृषाली कार्दोझ (मिश्र दुहेरी ५५+), रूपचंद्र हमरस्कर (पुरुष एकेरी ६०+), चोलू गावस/रूपचंद्र हमरस्कर (पुरुष दुहेरी ६०+)
मनीष पटेल/मंजू खांडेपारकर (मिश्र दुहेरी ६०+), सतीशचंद्र खांडेपारकर (पुरुष एकेरी ६५+), सुरेंद्र कामत/पीटर टेलीस (पुरुष दुहेरी ६५+), तानाजी सावंत/रोसेलिन बन्यान (मिश्र दुहेरी ६५+).