फर्निचर, कपडे, घरगुती उत्पादनांसह मिठाई, गृहोपयोगी उत्पादने एक्स्पोमध्ये दाखल
मडगाव : सध्या मडगाव येथील बीपीएस स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू असलेल्या गोवा बेळगाव एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बेळगावमधील अनेक व्यापारी आणि शोरूम मालक त्यांच्या ग्राहकोपयोगी आणि उपभोग्य उत्पादनांचे प्रदर्शन करत आहेत.
प्रुडंट मीडिया नेटवर्कने आयोजित केलेल्या या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये फर्निचर, कपडे, फॅशन, घरगुती उत्पादने, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, पाण्याच्या टाक्या आणि गृहोपयोगी सर्व उत्पादने उपलब्ध आहेत.
प्रुडंट मीडिया नेटवर्कने आयोजित केलेल्या या तीन दिवसांचा हा एक्स्पो गोव्यातील लोकांसाठी एक उत्तम संधी ठरत आहे. गोवेकरांसाठी एकाच छताखाली त्यांच्या पसंतीची उत्पादने पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
स्टॉल मालक गोव्यातील ग्राहकांसाठी विशेष सवलतींसह विविध उत्पादने देत आहेत. हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून एकाच छताखाली इतके गोवेकर येत आहेत हे पाहून खरोखर आनंद झाल्याचे एक्स्पोमध्ये सहभागी स्टॉल मालक ऋषी पाटील म्हणाले.
जगप्रसिद्ध गोकाक जनता कार्डंटचा एक्स्पोमध्ये स्टॉल असून या स्टॉलद्वारा मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ ग्राहकांनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्टॉलतर्फे तीन विशेष प्रकार ऑफर जाहीर करण्यात आल्या असून विशेष कार्डंट, प्रीमियम कार्डंट आणि रॉयल गोल्ड कार्डंट असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेला बेळगावचा प्रसिद्ध कुंदा हा देखील या स्टॉलवर उपलब्ध असल्याची माहिती स्टॉल मालक प्रशांत अंकडावार यांनी दिली आहे.
आम्ही गोदरेज डिजिटल लॉक्स आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. जिथून ग्राहक उत्पादने पाहू शकतात आणि त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी ऑनलाइन बुक करू शकतात, अशी प्रतिक्रिया सचिन हंगिरगेकर यांनी दिली. गोवेकरांसाठी ही खरेदीची चांगली संधी असून स्टॉलला भेट देणाऱ्या गोवेकरांसाठी एक विशेष ऑफर असल्याचे श्रीमा इनोव्हेशन्सचे हंगिरगेकर म्हणाले.
अॅपटेक एव्हिएशन अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे म्हणाले की अकादमीने विमान वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्रात अनेक गोव्यातील तरुणांना प्रशिक्षण दिले आहे आणि काही अभ्यासक्रम प्रदर्शित करण्यासाठी एक स्टॉल उभारला आहे. “विमान वाहतूक आणि आदरातिथ्य उद्योगात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांना आणि तरुण मुला-मुलींना या स्टॉलला भेट देण्यास आणि तपशीलवार माहिती मिळविण्यास प्रोत्साहित केले जाते.
आम्ही एक अकादमी स्थापन केली असून आमच्याकडून प्रशिक्षित केलेले अनेक गोवेकर आता जगभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आणि तारांकित हॉटेल्समध्ये सेवा देत आहेत, अशी माहिती बामणे यांनी दिली. “एक्स्पो दरम्यान नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलती दिल्या जातील. शिवाय, आम्ही गोव्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करत असल्याचे विनोद बामणे म्हणाले.
परमार युनिफॉर्म्सचे शहापूर-बेळगाव येथे शोरूम असलेले हे युनिफॉर्म्स कॉर्पोरेट, उद्योग, हॉटेल्स, शाळा आणि महाविद्यालयांसाठी सर्व प्रकारचे युनिफॉर्म तयार करतात. सद्य स्थितीत आम्ही पेप्सी, एल अँड टी, होंडा, मारुती सुझुकी आणि अनेक शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि शोरूमना युनिफॉर्म पुरवत आहोत. आमच्या उत्पादनांसाठी आम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यात वितरक/डीलर शोधत आहोत, असे मालक महेंद्रकुमार परमार म्हणाले. आम्ही युनिफॉर्म बुक करणाऱ्यांसाठी विशेष सवलती देखील देत आहोत, असे परमार म्हणाले.
कारेकर यांचा मराठी स्टाईल मटण भाकरी आणि इतर मांस आणि चिकनचे स्वादिष्ट पदार्थ विकणारा स्टॉल या एक्सोमध्ये दाखल झाला आहे. बेळगाव शिवाजीनगर येथील मटण भाकरी हॉटेल हे गोव्यातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही आमच्या स्टॉलला भेट द्या आणि मराठा स्टाईल मटण आणि चिकनच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या, असे साहुल कारेकर म्हणाले.
• शहापूरचे ' श्री राम इनोव्हेशन्स' एक्सपोमध्ये दाखल-
श्री राम इनोव्हेशन्सचा एक स्टॉल एक्स्पोमध्ये असून यामध्ये एसपीसी शीट्स, स्टोन पॉलिमर कंपोझिट इत्यादी, पीव्हीसी फ्लँक्स आणि पीव्हीसी सीलिंग्ज सारख्या इंटीरियर आणि हार्डवेअर उत्पादनांचे प्रदर्शन सुरू आहे. गोव्यातील ग्राहक या स्टॉलला भेट देऊ शकतात आणि त्यांना आवश्यक त्या वस्तू बुक करू शकतात.
• 'मेहंदी', हुन्स टॉकीज रोड द्वारा विशेष ऑफर
'मेहंदी'द्वारा नियमित वापरासाठीच्या साड्या, ब्रोकेट साड्या, सिल्क, कांजीवरम, कॉटन सिल्क, कोचमपल्ली, सॉफ्ट सिल्क, लग्नाचे कलेक्शन, वधूचे कपडे, नियमित वापरासाठी कुर्ती, पैठणी आणि शुद्ध सिल्क साड्या प्रदर्शनात मांडल्या आहेत.
एक्स्पोमधील स्टॉलवर विक्रीसाठी असलेल्या साड्या आणि ड्रेस मटेरियल उच्च दर्जाचे आहे. स्टॉलवर विशेष ऑफर असून या बेळगाव शोरूमला भेट देणाऱ्या गोव्यातील लोकांना १०टक्के सूट दिली जाईल,”असे स्टॉलचे हर्ष खोडा म्हणाले.
• 'श्री ग्लास डेकोरेटिव्ह'मार्फत सजावटीची उत्तम संधी
महात्मा फुले रोड, बेळगाव येथे शोरूम असलेले श्री ग्लास डेकोरेटिव्ह या प्रदर्शनात सहभागी झाले असून इंटीरियर डेकोरेटिव्ह ग्लास, टफन ग्लास, लॅमिनेशन ग्लास, रंगीत इचिंग ग्लास, आरसे आणि प्लायवूड हार्डवेअर, व्हेनियर्स देत आहे.
घराच्या सजावटीसाठी काच, प्लायवूड, व्हेनियर आणि सर्व प्रकारच्या सेवांसाठी घाऊक आणि किरकोळ स्वरुपात मटेरिअल उपलब्ध आहे. या प्रदर्शनात ऑर्डर बुक करणाऱ्यांसाठी आम्ही १० टक्क्यांपर्यंत सूट देखील देत आहोत,” असे श्री ग्लास डेकोरेटिव्हचे मालक आनंद एन. बस्तवाडकर म्हणाले.
• उद्यमबाग येथील कलाश्री सोलर अँड बंब गोवेकरांच्या सेवेत
कलाश्री सोलर अँड बम्ब्सचे प्रकाश डोळेकर यांनी अलीकडेच कलाश्री फोर-इन-वन सोलर वॉटर हीटर (बंब) लाँच केले असून भारतात अशाप्रकारचे बंब पहिल्यांदाच लाँच केले गेले आहे. हे सूर्यप्रकाश, वीज (हीट पंप), गॅस आणि लाकडावर काम करतात.
विजेवर चालणारा हीट पंप वीज बिलाच्या सुमारे ९० टक्के बचत करतो. या एक्स्पोमध्ये आमची उत्पादने बुक करणाऱ्यांसाठी आम्ही १,००० रुपयांपासून १०,००० रुपयांपर्यंत सूट आणि मोफत होम डिलिव्हरी देतो. इलेक्ट्रिक गीझर, प्युरिफायर, फर्निचर, आटा चक्की इत्यादी येथे उपलब्ध आहेत,” असे डोळेकर म्हणाले.
• बीएससी टेक्सटाइल मॉल, बेळगाव
शुक्रवार पेठेतील फर्स्ट रेल्वे गेटजवळ असलेला बीएससी टेक्सटाइल मॉल उर्फ बीएस चेन्नाबासप्पा अँड सन्स, हा सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये लोकप्रिय ब्रँड बनला आहे. गोव्यातील बहुतांश घरांपर्यंत हा ब्रँड पोहोचला आहे. एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या या स्टॉलवर विविध प्रकारचे वधूचे कपडे, वराचे कपडे आणि घरगुती फर्निचर प्रदर्शित केलेले आहे. स्टॉलला भेट देणाऱ्या गोमंतकीयांना २०२५ चे खास कॅलेंडर देखील दिले जात आहे.
• 'नंदिनी दूध' तर्फे दूध, बेळगाव कुंदा गोवेकरांसाठी दाखल-
बेळगाव मिल्क युनियन जे प्रसिद्ध नंदिनी ब्रँडचे दूध आणि इतर मिठाई, आईस्क्रीम गोव्यातील लोकांना सेवा देण्यासाठी बीपीएस स्पोर्टस क्लबच्या मैदानावर आयोजित बेळगाव एक्स्पोमध्ये दाखल झाले आहे. ग्राहकांची तहान भागवण्यासाठी आणि त्यांच्या चवीला आनंद देण्यासाठी आमच्याकडे दूध, पेढा, बेळगाव कुंदा, म्हैसूरपाक, धारवाड पेढा, काजूकतली आणि कुकीज इत्यादी उपलब्ध आहेत.
जागतिक स्तरावर प्रसिद्ध नंदिनी ताजी आणि थंडगार लस्सी आणि बटर मिल्क आणि स्वादिष्ट नंदिनी आईस्क्रीम देखील उपलब्ध असल्याचे असे बेळगाव मिल्क युनियनचे उपमहाव्यवस्थापक मल्लिकार्जुन स्वामी म्हणाले. डीलरशिप आणि पार्लरसाठी, इच्छुक गोवेकर स्टॉलला भेट देऊ शकतात, अशी माहिती ही स्वामी यांनी दिली.
• सुसज्ज घरांसाठी 'क्लासिक फर्निटो मॉल'-
क्लासिक फर्निटो मॉलचे ऋषी पाटील म्हणाले की त्यांनी गोव्यातील ग्राहकांसाठी काही दुर्मीळ फर्निचर उत्पादने आणली असून त्यांची विक्री अत्यंत किफायतशीर किमतीत केली जात आहे. “आम्ही गेल्या दोन दशकांपासून गोव्यातील लोकांना सेवा देत आहोत आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक गोव्यातील घरे सुसज्ज करून सेवा दिली आहे.
येथे आमच्या स्टॉलसह, गोवेकर त्यांच्या सर्व इंटीरियरसाठी आमच्याशी संपर्क साधू शकतात, सर्व एकाच छताखाली स्वयंपाकघरातील ट्रॉली, बेड, वॉर्डरोब, पडदे, वॉलपेपर, पीओपी वर्क्स आणि एकूण फर्निचरिंग उपलब्ध असून सोफा सेट, डायनिंग टेबल, वॉर्डरोब इत्यादींवर या एक्स्पोमध्ये विशेष सवलती देत असल्याची माहिती असल्याचे पाटील यांनी दिली.