आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

बाॅक्सऑफिस ‘फतेह’ करायला येतोय सोनू सूद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
09th January, 11:53 pm
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

आज थिएटरमध्ये सोनू सूदचा ‘फतेह’ तर रामचरणचा ‘गेम चेंजर’ झळकणार आहेत.  ओटीटीवर ‘द साबरमती रिपोर्ट’सोबतच अनेक मालिका आणि चित्रपट झळणार आहेत.


फतेह । थिएटर
‘फतेह’ हा एक अॅक्शन थ्रिलर आहे, जो एका रहस्यमय व्यक्तीवर केंद्रित आहे, जो एका हॅकरच्या मदतीने सायबर गुन्हेगारीतील सिंडिकेटला उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेवर निघतो. या चित्रपटात सोनू सूद याने लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह इतर कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत.


गेम चेंजर । थिएटर
हा तेलुगु राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. जो एका प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्याभोवती फिरतो. जो भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एक मोहीम सुरू करतो. एस शंकर दिग्दर्शित, या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिका साकारत आहेत, तर कियारा अडवाणी, अंजली, समुथिरकानी, श्रीकांत आणि प्रकाश राज सहाय्यक भूमिका साकारत आहेत.


द साबरमती रिपोर्ट । झी५
विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धि डोग्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा २००२ च्या गुजरातच्या गोधरा ट्रेन कांडवर आधारीत हा चित्रपट आहे. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या तपासास शक्तिशाली व्यक्ती अडथळा आणतात. वर्षांनंतर, दुसरा पत्रकार पुन्हा त्या प्रकरणाचा तपास सुरू करतो.


अॅड विटॅम । नेटफ्लिक्स
हा एक्शन-पॅक्ड नेटफ्लिक्सवरील चित्रपट एका माजी एजंटच्या जीवनावर आधारीत आहे. त्याच्या भूतकाळातील एक भूत त्याच्यावर आणि त्याच्या गर्भवती पत्नीवर हल्ला करते तेव्हा गुप्तचर जगात तो पुन्हा प्रवेश करतो.


ब्लॅक वॉरंट - नेटफ्लिक्स
‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘सीटीआरएल’चे निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांनी तयार केलेली ही रोमांचक मालिका तिहार तुरुंगातील विविध आव्हानांवर मात करणाऱ्या एका नवशिक्या अधीक्षकाची ही कथा आहे. ही मालिका सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांच्या २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ब्लॅक वॉरंट: कॉन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ या कादंबरीवर आधारीत आहे. यामध्ये झहान कपूर, परमवीर सिंह चीमा, अनुराग ठाकूर आणि सिद्धांत गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


गुझबम्प्स: द व्हॅनिशिंग । डिस्ने+ हॉटस्टार
‘गुझबम्प्स: द व्हॅनिशिंग’ हा एक रोमांचक चित्रपट आहे. जो जुळी भावंडे, देविन आणि सीसी यांच्यावर आधारीत आहे. जे त्यांच्या वडिलांसह उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी निघतात आणि एका स्थानिक दुर्घटनेशी संबंधित महत्त्वाचा दुवा उलगडतात. पुढे घडणाऱ्या घटना तुम्हाला अखेरपर्यंत खूर्चीला खिळवून ठेवताता.


डेन ऑफ थीव्ह्स २: पँथेरा । थिएटर
गेरार्ड बटलर आणि ओशे जॅक्सन ज्युनियर हे ‘डेन ऑफ थीव्ह्स’ चा दुसरा भाग घेऊन आले आहेत. ही चित्रपट निकोलस ओ'ब्रायनवर केंद्रित आहे, जो डोनी विल्सनला पकडण्यासाठी युरोपला जातो, ज्याने आधीच एक नवीन दरोड्याची योजना आखली आहे.

अल्फा मेल्स सीझन ३ । नेटफ्लिक्स

दोन रोमांचक सीझननंतर, नेटफ्लिक्स ‘अल्फा मेल्स’ च्या नवीन मालिकेसह परतले आहेत. ज्यामध्ये चार जवळच्या मित्रांचा एक गट आहे जो आधुनिक पुरुषत्वाच्या युगात प्रणय, पितृत्व आणि लैंगिकतेच्या विकसित होत असलेल्या गतिशीलतेमध्ये जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.  

हेही वाचा