आज अंतिम मुदत : अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धत
पणजी : भरती आयोगाला एलडीसी आणि स्टेनोग्राफरच्या २८५ पदांसाठी १०,००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आयोगाच्या सूत्रांककडून ही माहिती प्राप्त झाली आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी, १३ डिसेंबर आहे. आयोगाकडे ऑनलाईनपद्धतीने अर्ज येणे सुरू आहे.
आयोगाने १९२५ पदे भरण्यासाठी जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने जाहिराती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. २८५ पदांसाठीची जाहिरात १९२५ पदांपैकी एक आहे. त्यापैकी २३२ एलडीसी आणि ५३ स्टेनोग्राफरसाठी आहेत. २१ नोव्हेंबरला जाहिरात देण्यात आली होती. आयोगाने परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम जाहिरातीसह जारी केला आहे. एलडीसी आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर पदासाठी प्रत्येकी ६० गुणांचे सीबीटी-२ आणि सीबीटी-३ असे दोन पेपर असतील. प्रत्येक पेपरसाठी वेळ मर्यादा ७५ मिनिटे असेल. गोवा सदनसह २० खात्यांमध्ये ज्युनियर स्टेनोग्राफरची ५३ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असून शुक्रवारी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.