आम्ही कोणत्याही कारवाईस तयार, मात्र मानहानी केल्याचे पुरावे द्या : आप

सरकारकडून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्नः नाईक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th December, 02:49 pm
आम्ही कोणत्याही कारवाईस तयार, मात्र मानहानी केल्याचे पुरावे द्या : आप

पणजी : आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची किंवा त्यांच्या पत्नीची मानहानी केल्याचे पुरावे द्यावेत. त्यानंतर आम्ही अब्रूनुकसानीचा दावा किंवा अन्य कोणत्याही कारवाईस तयार आहोत, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी दिली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फ्रान्सिस कुएलो, रोहन नाईक आणि सलमान खान उपस्थित होते.

वाल्मिकी नाईक म्हणाले की, गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचे नाव घेतले होते. ते जे बोलले होते तेच आम्ही परत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करावा. आम्ही देखील कोणत्याही कारवाईस तयार आहोत. या प्रकरणात भाजप सरकार विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही शांत राहणार नाही.

'ईडी'कडून तक्रारदारच लक्ष्यः नाईक

हे प्रकरण जेव्हा पासून सुरू झाले तेव्हा पासून संशयित किंवा तक्रारदारांना अप्रत्यक्षपणे भीती घालण्यात येत आहे. आधी 'संशयितांची मालमत्ता जप्त करणार', असे सांगून त्यांना गप्प केले. त्यानंतर 'पैसे देणाऱ्यांवर कारवाई करणार', असे वक्तव्य करून तक्रारदारांना भीती घातली. या वक्तव्यानंतर या प्रकरणी तक्रारी येण्याचे प्रमाण देखील कमी झाले. सध्या ईडी या प्रकरणांचा तपास करण्याऐवजी तक्रारदारांना लक्ष्य करत आहे असा आरोप नाईक यांनी केला.

हेही वाचा