वृद्ध अवलिनाचा खून; मृत भावावर गुन्हा दाखल

किटला हळदोणा येथील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th December, 12:10 am
वृद्ध अवलिनाचा खून; मृत भावावर गुन्हा दाखल

म्हापसा : किटला हळदोणा येथे मृतावस्थेत आढळलेल्या सेबस्तियन कार्दोज (६८) व अवलिना कार्दोज (७२) या सख्ख्या भाऊ-बहिणीचे मृतदेह शवचिकित्सेनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अवलिना हिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. ब​हिणीचा गळा दाबून खून केल्याचे शवचिकित्सा अहवालातून उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मृत सेबस्तियन या भावावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

गुरुवार, दि. ५ रोजी संध्याकाळी सेबेस्तियनचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत तर अवलिना हिला मृतदेह पलंगावर पडून होता. तिच्या तोंडातून फेस आला होता.

दरम्यान, मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली होती. ही नोट सेबेस्तियन यानेच लिहिली होती, असे पोलीस तपासातून दिसून आले होते. दरम्यान, अवलिना हिच्या मृतदेहाची चिकित्सा केली असता तिचा गळा दाबून खून केला असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी भाऊ सेबस्तियन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा