केरळच्या अलाप्पुझा भागात भरधाव कारची 'राज्य परिवहन'च्या बसला धडक, ५ जण जागीच ठार

अपघातातील विद्यार्थी सरकारी मेडिकल कॉलेजमध्येएमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याची माहिती आली समोर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 02:17 pm
केरळच्या अलाप्पुझा भागात भरधाव कारची 'राज्य परिवहन'च्या बसला धडक, ५ जण जागीच ठार

अलाप्पुझा: केरळच्या अलाप्पुझा भागात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघातात ५ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही मुले ज्या कारमधून प्रवास करत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला धडकली. ही घटना रात्री १० च्या सुमारास कलाकोड परिसराजवळ घडली. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. कारचे लोखंडी पार्ट वेगळे करून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातातील विद्यार्थी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. कारमध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या दुर्घटनेत बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. 

अलाप्पुझा येथील टीडी मेडिकल कॉलेजमध्ये हे ५ विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिकत होते. मृतांमध्ये लक्षद्विपचा देवनंदन, मोहम्मद इब्राहिम, आयुष शाजी, श्रीदीप वलसन आणि मोहम्मद जब्बार याचा समावेश आहे. रेस्क्यू टीममध्ये या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मेटल कटरचा वापर करून कारचे काही भाग कापावे लागले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

हेही वाचा