फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, पुदुच्चेरीत पाऊस आणि भूस्खलन

केरळ, तेलंगण, कर्नाटक, आंध्रात पाऊस; येत्या दोन दिवसांत मुसळधार बरसणार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 11:16 am
फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, पुदुच्चेरीत पाऊस आणि भूस्खलन

चेन्नई : गेल्या तीन दिवसांपासून फेइंजल चक्रीवादळामुळे तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत हाहा:कार उडाला असून तिरुवन्नामलाई येथे भूस्खलन झाल्याने तब्बल ४० टन वजनाचा दगड दोन घरांवर पडल्याचा प्रकार घडला. त्याखाली सात जण दबलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. फेंगल चक्रीवादळामुळे केरळ, तेलंगण, कर्नाटक आणि आंध्रात देखील पाऊस पडत आहे.तसेच येत्या दोन दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.Tamil Nadu Landslide: Seven feared dead in landslide after rain | Chennai  News - Times of India

फेंगल चक्रीवादळ ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पुद्दुचेरीच्या कराईकल आणि तमिलनाडूच्या महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीला धडकले. आता ते चक्रीवादळ केरळ, तेलंगण आणि आंध्रात पोचले आहे. तत्पूर्वी तमिळनाडूत पावसाने जोरदार हजेरी लावली. तिरुवन्नामलाई येथे डोंगरभागात भूस्खलन झाल्याने चाळीस टन वजनाचा दगड घसरत तो वीयुसीनगरच्या रस्त्यालगत असलेल्या घरांवर पडला. त्यात दोन घरे जमीनदोस्त झाले आणि त्यात सात जण अडकल्याची भीती आहे.वादळाचा तडाखा, चेन्नईत मोठी विमान दुर्घटना टळली | Saamana (सामना)

हवाई दुर्घटना टळली- 

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील चेन्नईत शनिवारी एक हवाई दुर्घटना बालंबाल टळली. मुंबईहून चेन्नईला येणारे इंडिगोचे विमान चक्रीवादळादरम्यान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विमान उतरण्याच्या तयारीत असताना वादळी वाऱ्यामुळे ते एकीकडे झुकले गेले. हा धोका ओळखून वैमानिकाने लॅडिंग रद्द करत विमानाने पुन्हा उड्डाण केले.7 trapped in house after landslip found dead in Tiruvannamalai - The Hindu

हेही वाचा