कळंगुटमध्ये काजूबिया विक्रीची तीन दुकाने सील

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई


09th November, 12:41 am
कळंगुटमध्ये काजूबिया विक्रीची तीन दुकाने सील

कळंगुटमध्ये एफडीएने टाळे ठोकलेले काजूबिया विक्री दुकान.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुटमध्ये निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ही तिन्ही दुकाने सील केली.
काजू बिया तपासणीवेळी परवीन बिश्नोई यांच्या मेसर्स द्वारकाधीश काजू, सोहन लाल यांच्या गुजराती काजूवाला व अविनाश पोवार यांच्या श्री राम एंटरप्रायझेस या तिन्ही दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेल्या निकृष्ट दर्जाच्या काजूबिया सापडल्या.
त्यामुळे दुकानातील कामकाज बंद करण्याचे निर्देश देत या दुकानांना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. तसेच पुढील कायदेशीर कारवाईसाठी या दुकानदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला. प्रशासनाच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न वरिष्ठ सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, भक्ती वाळके, प्रदीक्षा चोपडेकर व सहकारी यांनी ही कारवाई केली.