‘घाटी’ चित्रपटाविषयी​ प्रेक्षकांना उत्सुकता

गुरुवारी दिसणार पहिली झलक : ॲमेझॉन प्राइम व्हिडीओकडे अधिकार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th November, 12:09 am
‘घाटी’ चित्रपटाविषयी​ प्रेक्षकांना उत्सुकता

पणजी : अरुंधती आणि बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या आगामी ‘घाटी’ या तेलगू चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. चित्रपटाचे नावच ‘घाटी’ असल्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे. गोव्यात ‘घाटी’ हा शब्द परप्रांतीयांना हिणवण्याच्या दृष्टीने वापरला जातो. मात्र हा चित्रपट त्यावर आधारित नाही, असे दिसून येते.

‘भागामती’ चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी याने ‘घाटी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकत्याच केलेल्या घोषणेनंतर चित्रपटाचे शीर्षक आणि पोस्ट-थिएटरीयल अधिकार संपादन केल्यानंतर चित्रपटाने रसिकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटातील कथानकाबाबत वेगवेगळी​ माहिती मिळत आहे. ज्यात अनुष्का शेट्टीला एक आकर्षक पात्र म्हणून दाखवले आहे. चित्रपट निर्मात्यांनी म्हटल्याप्रमाणे, कथनात सूड आणि प्रतिशोध यांचे चित्तवेधक मिश्रण आहे. सुरुवातीच्या लूक पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता चाळवली असून पडद्यावर क्रिश जगरलामुडी याचे दिग्दर्शकीय कसब पाहण्यास रसिक उत्सुक आहेत.

क्रिश, साई माधव बुर्रा आणि चिंताकिंडी श्रीनिवास राव यांनी पटकथा लिहिली असून विक्रम प्रभू या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. घाटी हा फर्स्ट फ्रेम एंटरटेनमेंट्स आणि यूव्ही क्रिएशन्स यांच्यातील सहयोगी प्रकल्प आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, घाटी हा चित्रपट आंध्र-ओडिशा सीमेवर गांजाच्या व्यापाराशी संबंधित आहे. आंध्र प्रदेश सरकारने हजारो एकर गांजाची लागवड नष्ट केली असली, तरी आंध्र आणि ओडिशा सीमेवरील गांजाचा व्यापार हा चर्चेचा सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. क्रिश जगरलामुडीने चित्रपट करण्यापूर्वी या विषयावर बरेच संशोधन केले आहे. याच संशोधनामुळे तसेच आशय, विषयातील खोलीमुळे अनुष्का शेट्टीने चित्रपट स्वीकारला आहे.

Anushka's Ghati: Here's the Latest Buzz - TeluguBulletin.com


‘घाटी’विषयी उत्सुकता...
‘घाटी’ हा शब्द गोव्यात शिवीसारखा वापरला जातो. अनुष्का शेट्टीच्या या चित्रपटात ‘घाटी’ हा शब्द नेमक्या कोणत्या उद्देशाने वापरला आहे, याबाबत समाज माध्यमांत चर्चा होताना दिसते. गुरुवार​ दि. ७ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाची पहिली झलक पाहायला ​मिळणार असून योगायोगाने त्याच दिवशी अनुष्का शेट्टीचा वाढदिवसही आहे.

हेही वाचा