पणजी : द किंग्डम ऑफ चेस इंटरनॅशनल ओपन टुर्नामेंट २०२४मध्ये अमेय अवदी याने चमकदार कामगिरी केली. उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या २०२४ च्या उद्घाटन किंगडम ऑफ चेस इंटरनॅशनल ओपन फिडे मानांकन चेस टूर्नामेंटमध्ये इंटरनॅशनल मास्टर्स (आयएम) अमेयने संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला.
किंगडम ऑफ चेसने आयोजित केलेल्या या स्पर्धेत २७ टायटल खेळाडूंसह ३३४ खेळाडू सहभागी झाले होते. अमेयने स्वरा फासगे (राजस्थान), प्रागदेश पी (तामिळनाडू), आराध्या जैन (गुजरात), विदित सेठी (उत्तर प्रदेश), सन्यम श्रीवास्तव (उत्तर प्रदेश), श्रायन मजुमदार (महाराष्ट्र) यांच्याविरुद्ध विजय मिळवत ९ फेऱ्यांपैकी ७.५ गुण मिळवले. त्याने काविन विजयकुमार (तामिळनाडू) विरुद्धही बरोबरी साधली. इतर सात खेळाडूंसह अव्वल स्थानासाठी बरोबरी असूनही टायब्रेक पद्धत लागू केल्यानंतर अमेय चौथ्या स्थानावर राहिला. शीर्ष तीन स्थानांवर आयएम मयंक चक्रवर्ती (आसाम), सुभ्यान कुंडू (रेल्वे) आणि मेहता नाईक आर (गुजरात) यांनी दावा केला.