‘जिगरा’मध्ये आलिया ‘अॅक्शन पॅक्ड’ अवतारात
या शुक्रवारी ओटीटी आणि चित्रपटगृहात अनेक चित्रपट मालिका दाखल होणार आहेत. यामध्ये रात जवान है, हॉरर ड्रामा टीकप, तमिळ चित्रपट वाझाई या चित्रपटांसह चित्रपगृहां आलिया भटच्या ‘जिगरा’सह ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ झळकणार आहेत.
जिगरा - थिएटर्स
सत्या (आलिया भट) नावाच्या तरुणीच्या अवतीभवती फिरणारा हा ॲक्शनपट आहे, जी परदेशातील तुरुंगात कैद झालेल्या आपल्या लहान भावाला, अंकुरला सोडवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेते. ती त्याला तुरुंगातून सुरक्षित बाहेर काढण्यात यशस्वी होईल का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट, वेदांग रैना, शोभिता धुलीपाला आणि मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टी कप (जियोसिनेमा)
ओटीटी रिलिजमध्ये ‘टी कप’ या भयपटाचा समावेश आहे. काही लोकांचा गट जंगलात अटकतो. त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्वत: ला वाचविण्यासाठी त्यांना एकसंध होऊन काम करावे लागते.
वाझाई (डिस्ने + हॉटस्टार)
नवीन ओटीटी रिलीजच्या यादीमध्ये वाझाई नावाच्या तमिळ चित्रपटाचा समावेश आहे. मारी सेल्वाराज दिग्दर्शित, हा चित्रपट एका लहान मुलाची कथा सांगतो. ज्याचे आयुष्य वेगळे वळण घेते जेव्हा तो केळीच्या मळ्यात एक दिवस काम न करण्याचा निर्णय घेतो.
लोनली प्लॅनेट (नेटफ्लिक्स)
ओटीटी रिलिजमध्ये लोनली प्लॅनेट हा एक रोमँटिक चित्रपट आहे, जो एका लेखिकेच्या जिवनावर आधारीत आहे. जिला मोरोक्कोच्या प्रवासात एक तरुण भेटतो आणि तिच्या जिवनात उलथापालथ होते. या चित्रपटात लॉरा डर्न आणि लियाम हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत आहेत.
रात जवान है (सोनी लिव्ह)
ओटीटी रिलिजमध्ये प्रिया बापट, वरुण सोबती आणि अंजली आनंद यांच्या मुख्य भूमिका असलेली मालिका रात जवान है सोनी लिव्हवर झळकणार आहे. ही मालिका तीन जवळच्या मित्रांभोवती फिरते. जे पालकत्व, व्यावसायिक गुंतागुंत आणि वैयक्तिक समस्यांना तोंड देत जीवनात मार्गक्रमण करतात.
अपरायझिंग (नेटफ्लिक्स)
जोसेन राजवंशात दिग्दर्शित कोरियन ऐतिहासिक ड्रामा अपरायझिंग दोन मित्रांची कथा आहे. जे जपानच्या कोरियावरील आक्रमणानंतर एकमेकांचे शत्रू बनतात. या मालिकेत गँग डाँग वोन, आणि पार्क ज्याँग मिन भूमिकेत आहेत.
विकी विद्या का वो वाला व्हिडिओ (थिएटर्स)
चित्रपटगृहात आज राज शांडिल्य दिग्दर्शित आणि राजकुमार राव आणि तृप्ती दिमरी अभिनीत विकी विद्या का वो वाला व्हिडिओ हा चित्रपट झळकणार आहे. चित्रपटाचे कथानक एका नवविवाहित जोडप्याभोवती केंद्रित आहे, ज्यांचे आयुष्य हेलावून जाते जेव्हा त्यांच्या घरातून त्यांच्या जिव्हाळ्याच्या क्षणांची एक टेप गायब होते. ते ती शोधू शकतील का, हे पाहण्यासाठी आपल्याला सिनेमागृहाची पायरी चढावी लागेल.
पूलमन - लायन्सगेट प्ले
ओटीटी रिलिजमध्ये ख्रिस पाइन दिग्दर्शित कॉमेडी मिस्ट्री चित्रपट मूव्ही डॅरेन बॅरेनमन नावाच्या एका पूल क्लीनरला फॉलो करतो, ज्याला लॉस एंजेलिसमधील भ्रष्टाचाराचा सौदा उलगडण्यासाठी एक स्त्री संपर्क करते. या चित्रपटाद्वारे पाइन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.