तिसवाडी : वेलिंगकर वादग्रस्त विधान प्रकरण : जनतेने शांततेत निषेध करावा; चर्चचे आवाहन

राज्याला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही सीएसजेपीने म्हटले आहे.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
06th October, 04:49 pm
तिसवाडी : वेलिंगकर वादग्रस्त विधान प्रकरण : जनतेने शांततेत निषेध करावा; चर्चचे आवाहन

पणजी : सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे केवळ ख्रिस्तीच नव्हे तर इतर धर्मातील लोकांच्याही भावना दुखावल्या आहेत. राज्यापुढे पर्यावरणा होणारा ऱ्हास तसेच इतर अनेक ज्वलंत समस्या आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा जनतेने शांतता राखत निषेध करावा, असे आवाहन चर्चने केले आहे.

कौन्सिल फोर सोशल जस्टीस अॅन्ड पीस (सीएसजेपी) संस्थेचे कार्यकारी सचिव फादर सावियो फर्नांडिस यांनी या विषयी पत्रक जारी केले आहे. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सीस झेवियर यांचा जो अपमान केला आहे, त्याबद्दल सरकारने कायद्या प्रमाणे कारवाई करावी. राज्यातली धार्मिक सलोखा कायम रहायला हवा. यासाठी जनतेने शांततापूर्ण मार्गांने निषेध करण्यास कोणतीच हरकत नाही. 

पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या अनेक गोष्टी राज्यात घडत आहेत. या विरूद्ध गोमंतकीय जनतेचा लढा सुरूच आहे. भविष्यासाठी गोवा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे. या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होउ नये, म्हणून प्रत्येकाने शांतता बाळगायला हवी, असे आवाहन चर्चने केले आहे.

हेही वाचा