बार्देश, पेडणेतील जमिनीचे किमान दर अधिसूचित
कळंगुट, कांदोळी, हणजूण, आसगावात किमान दर २५ हजार प्रती चौ. मी.
Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th September, 01:04 am
- - जमिनीचे एस १, एस २ असे वर्गीकरण
- एस १ भागात १ हजार चौ.मी.पर्यंत सुधारित किंमत
- ५०० चौ.मी.पर्यंत दर ३० टक्क्यांनी होणार कमी
पणजी : राज्य सरकारने बार्देश आणि पेडणे तालुक्यातील जमिनीचे कमीत कमी दर ३ हजारांवरून ८ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या तालुक्यांतील सर्वच गावांतील जमिनीचे दर वाढले आहेत. कळंगुट, कांदोळी, हणजूण आणि आसगावात हा दर २५ हजार प्रती चौरस मीटर झाला. सुधारित दरांची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार सर्वांत जास्त जमिनीचे दर बार्देश तालुक्यातील या चार पंचायत क्षेत्रात आहेत.
पेडणे आणि बार्देश तालुक्याचा वेगाने विकास होत आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून कोट्यवधींची उलाढाल या दोन तालुक्यांत होत असते. सरकारचा महसूल वाढविण्यासाठी या दोन्ही तालुक्यांमध्ये जमिनीचे दर ३ हजारांवरून ८ हजार रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या दोन्ही तालुक्यांतील पंचायत क्षेत्रातील कमीत कमी दर अधिसूचित झाले आहेत.
सरकारने एस १, एस २, एस ३, एस ४ तसेच सी १, सी २, सी ३ आणि सी ४ अशी विभागणी केली आहे. अधिसूचित दर एस १ विभागात १ हजार चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी लागू होणार आहेत. तसेच एस १ ते एस ४ विभागात ५०० चौरस मीटरपर्यंतच्या जमिनीसाठी दर ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
बार्देश तालुका (दर रुपयांत)
शहरी क्षेत्र :
म्हापसा - ४,८०० आणि ३,००० वरून १८,०००
विकसित क्षेत्र (दर रुपयांत)
गिरी - ४,८०० वरून १५,०००
पेन्ह द फ्रान्स - ३,६०० वरून १५,०००
साल्वादोर द मुंद - ३,६०० वरून १५,०००
पिळर्ण - ६,००० वरून १५,०००
कोलवाळ - ३,६०० वरून १०,०००
थिवी - ३,००० वरून १०,०००
बस्तोडा - ४,८०० वरून ८,०००
रेईस मागूस - ४,८०० वरून २०,०००
वेर्ला - ६,००० वरून १२,०००
पर्रा - २,४०० वरून १५,०००
काणका - ४,२०० वरून १२,०००
ग्रामीण क्षेत्र
सांगोल्डा - ३,६०० वरून १२,०००
मयडे - ३,६०० वरून १०,०००
आसगाव - ३,६०० वरून २५,०००
शिवोली - ४,८०० वरून १८,०००
हळदोणा - ४,८०० वरून १२,०००
हडफडे - ५,४०० वरून १५,०००
सुकूर - ४,८०० वरून १५,०००
कामुर्ली - ३,६०० वरून ६,०००
शिरसई - ३,००० वरून ६,०००
नागवा - ३,६०० वरून ८,०००
नास्नोडा - २,४०० वरून ५,०००
उस्कई - ३,६०० वरून ६,०००
मार्रा - ६,००० वरून १२,०००
नादोडा - २,१६० वरून ४,०००
मयते - २,४०० वरून ५,०००
अस्नोडा - २,४०० वरून ६,०००
ओशेल - ४,८०० वरून ९,०००
पिर्ण - २,१६० वरून ६,०००
रेवोडा - ३,००० वरून ६,०००
पालये - ३,००० वरून ६,०००
साळगाव - ४,८०० वरून १२,०००
मार्ना - ७,२०० वरून १२,०००
कालवी - २,४०० वरून ६,०००
खोर्जुवे - ३,००० वरून ६,०००
पुनोळा - ३,००० वरून ६,०००
पोंबुर्पा - ३,००० वरून ८,०००
ओळावली - ३,००० वरून ६,०००
पुनाळी - २,४०० वरून ५,०००
किनारी क्षेत्र
हणजूण - ५,४०० वरून २५,०००
कांदोळी - ६,००० वरून २५,०००
कळंगुट - ६,००० वरून २५,०००
नेरुल - ६,००० वरून १२,०००
पेडणे तालुका (दर रुपयांत)
शहरी क्षेत्र
पेडणे नगरपालिका - ३,००० वरून ८,०००
विकसित क्षेत्र
धारगळ - १,२०० वरून ६,०००
तुये - १,२०० वरून ७,०००
ग्रामीण क्षेत्र
तोर्से - ६०० वरून २,०००
तांबोसे - १,४४० वरून ३,०००
मोपा - ६०० वरून १५,०००
उगवे - ७८० वरून २,०००
खाजने - ८४० वरून २,०००
अमेरे - ४८० वरून १,५००
पोरस्कडे - ८४० वरून १,५००
वारखंड - ३६० वरून १,५००
वझरी - ९३१.२० वरून २,०००
कासारवर्णे - १,२०० वरून ३,०००
चांदेल - १९५.३० वरून १,५००
हसापूर - २४० वरून १,५००
हळर्ण - ६०० वरून १,५००
इब्रामपूर - ४८० वरून १,५००
विर्नोडा - ६०० वरून २,०००
आगरवाडा - ७२० वरून ५,०००
चोपडे - ५३२.८० वरून ६,०००
पालये - ६०० वरून ३,०००
कोरगाव - ६०० वरून ४,०००
पार्से - ६०० वरून ३,०००
किनारी क्षेत्र
मोरजी - ३,००० वरून १५,०००
मांद्रे - ३,००० वरून १५,०००
हरमल - ३,००० वरून १५,०००
केरी - ३,००० वरून १५,०००
तेरेखोल - ३,००० वरून १२,०००
किनारी क्षेत्रात सी १, सी २, सी ३ आणि सी ४ अशी जमिनीची वर्गवारी करण्यात आली आहे. या क्षेत्रात दर वेगवेगळे आहेत. हे दर कूळ आणि मुंडकार प्रकरणातील तसेच शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारांना लागू होणार नाहीत.