फोंडा : कामगार नेते अॅड. पुती गावकर यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आपचे अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांना पुती गावकर यांनी आपला राजीनामा ई-मेल केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचे माहिती अॅड. पुती गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम आदमी पक्षाने गोव्यातील खाणीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन लोकांना दिले होते. पण खाणीसंबधी ते गंभीर नसल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीनंतर आपण अलिप्त राहिलो होतो. राजकारण क्षेत्र सोडून सध्या शेती आणि कामगारांच्या समस्यांवर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार शेतीकडे दुर्लक्ष करीत आहे. भविष्यात लोकांचा शेती व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे पुती गावकर यांनी सांगितले.