‘एएसआय’ला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंद

रजत आडपईकर याची बुलेट जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th September, 12:05 am
‘एएसआय’ला मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंद

फोंडा : बाणस्तारी येथे बुधवारी दुपारी ड्युटीवर असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक विवेक फडते यांना मारहाण प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी रजत आडपईकर, वडील रजनीकांत आडपईकर, आई शीतल आडपईकर व चुलत बंधू सोनल आडपईकर यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा नोंद केला आला. म्हार्दोळ पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रजत आडपईकर याची बुलेट जप्त केली आहे.

बुधवारी दुपारी जुने गोवा येथून फोंडा येथे जीए -०७-एडी -३८४१ क्रमांकाची बुलेट घेऊन रजत आडपईकर हा फोंडा येथे जात होता. विनाहेल्मेट व बुलेटला दोन्ही आरसे नसल्याने त्याठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी बुलेट रोखून धरली. त्यावेळी बुलेट चालक व सहाय्यक उपनिरीक्षक विवेक आडपईकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी बुलेट चालकाने सहाय्यक उपनिरीक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मागाहून कार घेऊन येणाऱ्या रजत आडपईकर यांच्या आई -वडिलांनी सहाय्यक उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात सुरुवात केली. जखमी झालेल्या विवेक फडते यांच्यावर गोमेकॉत उपचार करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा म्हार्दोळ पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्हा नोंद केलेल्या ४ संशयितांना म्हार्दोळ पोलिसांनी नोटीस बजावली आहे. निरीक्षक योगेश सावंत या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा