अटीतटीच्या लढतीत किरगिझस्तानच्या कुस्तीपटूकडून मात
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ७६ किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू रीतीका हुड्डा हिला उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या अव्वल मानांकित आयपेरी मेडेट कियझीकडून गुणांवर पराभव पत्करावा लागला. आता कायझीने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर रितिका कांस्यपदकासाठीचा सामना खेळू शकते.
अखेरच्या क्षणी रितिकाचा गुण घेण्याचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि ती आयपेरीकडून ३-१ ने पराभूत झाली. अव्वल मानांकित आयफेरीने अंतिम गुण मिळवला. दोन्ही कुस्तीपटू आपापल्या खेळात आघाडीवर असल्याने सामना १-१ असा संपला. रितिकाला अजूनही संधी आहे कारण ती रिपेचेज फेरीत प्रवेश करू शकते. आता कायझीने अंतिम फेरीत प्रवेश केला तर रितिका कांस्यपदकासाठीचा सामना खेळू शकते.
प्री-क्वार्टरमध्ये हंगेरीच्या बर्नाडेटचा केला पराभव
७६ किलो वजनी गटात कुस्तीपटू रितिका हुड्डाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये हंगेरीच्या बर्नाडेट नागीशी हिचा १२-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर किरगिझस्तानची अव्वल मानांकित कुस्तीपटू आयपेरी मेडेट किझी हिचे मोठे आव्हान होते. हा सामना सर्वात कठीण मानला जात हाेता.