लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर डबल डेकर बसची दुधाच्या कंटेनरला धडक, १८ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th July, 09:43 am
लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर डबल डेकर बसची दुधाच्या कंटेनरला धडक, १८ जणांचा मृत्यू

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन परिसरात डबल डेकर बस आणि दुधाच्या कंटेनरमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बसमधील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सुमारे २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये १४ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. UP: 18 killed, 19 injured as bus from Bihar to Delhi rams into milk tanker  on Lucknow-Agra Expressway in Unnao | Latest News India - Hindustan Times

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहता मुजावर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या दुधाच्या टँकरला पहाटे ५:१५ च्या सुमारास धडकल्याने १८ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केले. बेहता मुजावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. उन्नावचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात बसचा वेग खूप जास्त होता अशी माहिती समोर आल्याचे माध्यमांना सांगितले. 

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची दखल घेतली आहे आणि मृतांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.Tragic Collision on Lucknow-Agra Expressway: 18 Dead, 19 Injured | Headlines

हेही वाचा