सावधान!.. निसर्ग भलताच कोपलाय; वाचा, एप्रिलमधील १२ भीषण नैसर्गिक दुर्घटना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
04th May, 11:48 am
सावधान!.. निसर्ग भलताच कोपलाय; वाचा, एप्रिलमधील १२ भीषण नैसर्गिक दुर्घटना

पणजी : मानवी प्रदूषणामुळे नैसर्गिक कवच इतके कमकुवत झाले आहे की सूर्याची अतिनिल किरणे थेट जीवसृष्टीला होरपळून काढू लागली आहेत. याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्तींच्या मालिका गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात या आपत्तींनी कहर केला. १ ते ३० एप्रिलमध्ये संपूर्ण जगभर दररोज नैसर्गिक आपत्ती सुरू होत्या. त्यातही १२ अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आगामी काळात संपूर्ण जगभर दिसू लागतील. याच घटनांवर ‘गोवन वार्ता’चा हा विशेष रिपोर्ट..

संपूर्ण एप्रिल महिना अत्यंत नैसर्गिक आपत्तींनी भरलेला होता. कुठे भयंकर भूकंपाचे धक्के बसले, कुठे भीषण वादळाचा तडाखा बसला. काही ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक मुसळधार पावसाने झोडपले. भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, अमेरिका, तैवान, युरोपच्या अनेक भागांत नैसर्गिक आपत्तींचा तडाख बसला आहे.

* १ एप्रिल रोजी सकाळी भारतात मोठी घटना घडल्याचे समोर आले. पश्चिम बंगालच्या जलपायगुडीच्या काही भागात अचानक झालेल्या वादळामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. वादळासोबत गारपीट झाल्याने सुमारे ८०० घरांचे नुकसान झाले.

सविस्तर इथे वाचा : अचानक आलेल्या वादळाने प. बंगालमध्ये ५ ठार, ३०० जखमी, ८०० घरांचे नुकसान

‍* २ एप्रिल रोजी जपानला ६.१ तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या वर्षाच्या सुरुवातीला येथे विध्वंसकारी भूकंप झाला होता. त्यानंतर ही दुसरी वेळ होती. या धक्क्याने लोक भयभीत झाले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर जपानचा किनारी भाग होता.

सविस्तर इथे वाचा : जपानला भूकंपाचा पुन्हा जोरदार धक्का... लोक भयभीत

* ३ एप्रिल रोजी तैवानच्या किनारपट्टीवर तेथील वेळेनुसार सकाळी ९ वाजता ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. या धक्क्यात एकाचा मृत्यू झाला. ५० हून अधिक जण जखमी झाले होते. १९९९ नंतर बेटावर बसलेला हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे. २५ वर्षांपूर्वी झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता ७.६ इतकी होती. त्यात सुमारे २,४०० लोकांचा मृत्यू झाला होता.‍


सविस्तर इथे वाचा : एप्रिल रोजी तैवानला २५ वर्षांनंतर पुन्हा भूकंपाचा तीव्र धक्का; १ ठार, ५० हून अधिक जखमी

* १६ एप्रिल रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जम्मू-काश्मीरमधील मेंढर आणि उरी येथील काही भागात प्रचंड नुकसान झाले. रस्त्यावर उभी केलेली अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. मेंढर ते पूंछपर्यंतचा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता.

सविस्तर इथे वाचा : तिवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यात पूरसदृश्य स्थिती; झेलम नदीत पलटली होडी, ६ शालेय मुलांचा मृत्यू

* १६ एप्रिलपासून सलग चार दिवस संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन आणि ओमान या चार आखाती देशांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. यात दुबईमध्ये गेल्या ७५ वर्षांत विक्रमी पावसाची नोंद झाली. जवळपास दोन वर्षांत इथे जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडला आहे. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला.


सविस्तर इथे वाचा :  दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

* ‍२२ एप्रिल रोजी पूर्व तैवानमधील हुआलियन काउंटीमधील शौफेंग शहराला अवघ्या ९ मिनिटांत पाच जोरदार भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर रात्रभर जमीन थरथरत राहिली. एका रात्री या भागाला तब्बल ८० पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.


सविस्तर इथे वाचा : तैवानला रात्रभर भूकंपाचे झटके... ८० हून अधिक वेळा थरथरली जमीन!

* २२ एप्रिल रोजी दक्षिण चीनमध्ये अतिवृष्टीमुळे ४ लोकांचा मृत्यू झाला. १० लोक बेपत्ता झाले. दक्षिण चीनमध्ये १६ एप्रिलपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ४४ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. या नदीकाठच्या भागांतील १ लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले.


सविस्तर इथे वाचा : चीनमध्ये भीषण पूर; १ लाखाहून अधिक बेघर! ४४ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

* २२ एप्रिल रोजी इस्रोने भारतासाठी अत्यंत चिंताजनक अहवाल जारी केला. त्या अहवालासोबत अनेक दशकांच्या उपग्रहांनी टिपलेल्या प्रतिमांचे विश्लेषण जोडले होते. यात हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग वाढला असून जलयप्रलय येण्याचे संकेत दिले आहेत.


सविस्तर इथे वाचा : वेगाने वितळू लागलाय हिमालयातील बर्फ; इस्रोने दिले जलप्रलयाचे दिले संकेत

* २३ एप्रिल रोजी केनियामध्ये सलग तीन दिवस पावसाने कहर केल्यानंतर देशाच्या बहुतांश भागाला महापुराने वेढले दिला. यात ३८ जणांचा मृत्यू. १ लाख १० हजारांहून अधिक लोक बेघर झाले. भूस्खलनामुळे अनेक भागांतील रस्त्यांचे जाळे नष्ट झाले आहे. तर, शेतीही पाण्याखाली गेली.


सविस्तर इथे वाचा : केनियाला भीषण महापुराचा वेढा; ३८ ठार, १.१० लाख नागरिक बेघर!

* २४ एप्रिल रोजी पाकिस्तानचे सर्वात मोठे महानगर कराचीमध्ये रात्री ३.२ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचे धक्के भारतात जम्मू काश्मीरपर्यंत जाणवले.

सविस्तर इथे वाचा :  पाकिस्तानच्या कराचीमध्ये ३.२ तीव्रतेचा भूकंप... जम्मू-काश्मीरपर्यंत बसले धक्के

* २६ एप्रिल रोजी तैवानमध्ये पुन्हा रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. एप्रिल महिन्यात तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही तिसरी वेळ होती. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे अनेक इमारती हादरल्या आहेत.

सविस्तर इथे वाचा : तैवानला महिनाभरात तिसऱ्यांदा शक्तिशाली भूकंपाचा धक्का! लोकांमध्ये पसरली भीती

* २६ एप्रिल रोजी मध्य पश्चिम अमेरिकेत भीषण वादळाने कहर केला. हे वादळ इतके धोकादायक होते की ओमाहा, नेब्रास्का येथे एक इमारत कोसळली. अनेक घरे पत्त्यासारखी कोसळली. यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अनेक लोक जखमी होते.


सविस्तर इथे वाचा : अमेरिकेला भीषण वादळाचा तडाखा... पत्त्यासारखी कोसळली घरे; अनेकजण जखमी

हेही वाचा