पाकिस्तानच्या कराचीमध्ये ३.२ तीव्रतेचा भूकंप... जम्मू-काश्मीरपर्यंत बसले धक्के

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 04:07 pm
पाकिस्तानच्या कराचीमध्ये ३.२ तीव्रतेचा भूकंप... जम्मू-काश्मीरपर्यंत बसले धक्के

काराची : पाकिस्तानचे सर्वात मोठे महानगर कराचीमध्ये बुधवारी रात्री ३.२ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. ही माहिती पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. या भूकंपाचे धक्के भारतात जम्मू काश्मीरपर्यंत जाणवले.

पाकिस्तानी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १२ किलोमीटर खाली होता. मात्र, त्याचे धक्के कायदाबाद, मालीर, गडप आणि सादी शहरासह शहराच्या बाहेरील भागात जाणवले. लोक त्यांच्या घरात होते. अचानक जमीन थरथरू लागल्यानंतर ते घरातून बाहेर पडले.

भूकंपाचे धक्के अनेक सेकंद जाणवले. त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बहरिया भागातील एका घराच्या भिंतीला तडा गेला. कोठूनही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. कराचीमध्ये बऱ्याच दिवसांनी भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी कराचीच्या विविध भागात ३.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.

हेही वाचा