अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या काँग्रेस नेत्याचा मृतदेह सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत

तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. केपीके जयकुमार धनसिंग यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातून सापडला आहे. धनसिंह अनेक दिवसांपासून बेपत्ता होते.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th May, 10:14 am
अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या काँग्रेस नेत्याचा मृतदेह सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत

चेन्नई: तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या काँग्रेस नेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी सापडला. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, केपीके जयकुमार धनसिंग यांचा अर्धा जळालेला मृतदेह त्यांच्याच शेतातून सापडला आहे. अवघ्या  काहीच दिवसांपूर्वी धन सिंह यांनी दावा केला होता की त्यांच्या जीवाला धोका आहे. धनसिंग यांच्या मुलाने यापूर्वी वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. Tamil Nadu police investigate foul play in Congress leader's mysterious  death on farm | Chennai News - The Indian Express

धनसिंग हे काँग्रेसच्या पूर्वीच्या तिरुनेलवेली युनिटचे प्रमुख होते. या प्रकरणाची उकल करण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे (टीएनसीसी) प्रमुख के. सेल्वापेरुंथागाई यांनी त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. विरोधकांनी या मुद्द्यावर सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि राज्य पोलिसांवर जोरदार टीका केली.  TN Congress leader, missing for 2 days, found dead with half burnt body,  hands tied with electric cables | Mint

 विरोधी पक्षनेत्यांनी शोक व्यक्त केला

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) सरचिटणीस आणि विरोधी पक्षनेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी केपीके जयकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये त्यांनी आरोप केला की, एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यासोबत घडलेली घटना तामिळनाडूमधील खालावलेली कायदा आणि सुव्यवस्था दर्शवते. यात सामील असलेल्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी आरोप केला की धनसिंग यांनी यापूर्वी जिल्हा पोलिसांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता आणि काही लोकांची नावेही घेतली होती. राजकीय हस्तक्षेपामुळेच तक्रारीवरही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.Tamil Nadu BJP chief Annamalai indulging in 'dead body' politics and  creating nuisance: Congress MP

हेही वाचा