‘मी खूप आजारी आहे’... प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायालयाला कळवले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 03:50 pm
‘मी खूप आजारी आहे’... प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायालयाला कळवले

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर मुंबईच्या एनआयए न्यायालयात हजर झाल्या. आता उद्यापासून (२६ एप्रिल) या खटल्याच्या सुनावणीला नियमित हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यावर त्यांच्या वकिलाने त्यांची प्रकृती नीट नसल्याचा हवाला दिला. तसेच तपासणीत सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

साध्वी प्रज्ञा न्यायालयातून बाहेर आल्यावर त्या म्हणाल्या, ‘मी शारीरिकदृष्ट्या खूप आजारी आहे. मी सत्यासाठी लढत राहीन. जोपर्यंत माझे शरीर मला साथ देईल, तोपर्यंत मी तपासामध्ये भाग घेईन.’

नुकतीच याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. वैद्यकीय कारणास्तव वैयक्तिकरित्या त्या न्यायालयात हजर राहू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले होते. ते न्यायालयाने मान्य केले. मात्र, आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हजर न झाल्यावर आवश्यक आदेश पारित केले जातील, असे आधीच न्यायालयाने स्पष्ट केले होते.

न्यायालयाने जारी केले होते वॉरंट

या प्रकरणी गेल्या महिन्यात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंटही जारी केले होते. हे वॉरंट खटल्याच्या वेळी उपस्थित न राहण्याबाबत होते. यानंतर त्यांच्या वकिलाने त्या आजारी असल्याने येऊ शकत नाहीत, असे सांगितले होते. या वॉरंटनंतर २२ मार्च रोजी त्या न्यायालयात हजर झाल्या. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक येथे झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभूरहून अधिक लोक जखमी झाले होते. साध्वी प्रज्ञा या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक होत्या.

हेही वाचा