पल्लवी धेंपोंची लंडन, दुबई, तामिळनाडूतही स्थावर मालमत्ता

पती-पत्नींकडे मिळून १११.४० कोटींची स्थावर संपत्ती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 01:08 am
पल्लवी धेंपोंची लंडन, दुबई, तामिळनाडूतही स्थावर मालमत्ता

पणजी : भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो आणि त्यांचे पती श्रीनिवास धेंपो यांच्याकडे कृषी, बिगरकृषी जमिनी व्यावसा​यिक इमारती तसेच लंडन, दुबई, मुंबई, तामिळनाडू, चेन्नई येथील निवासी इमारती मिळून १११.४० कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे पल्लवी धेंपो यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाले आहे.
उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याकडे ८.८१ कोटींची, काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप व त्यांच्या पत्नीकडे मिळून १०.०८ कोटींची, तर दक्षिण गोव्याचे उमेदवार वि​रियातो फर्नांडिस आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून १.७३ कोटींची मालमत्ता आहे.
पल्लवी धेंपों आणि त्यांचे पती​ श्रीनिवास यांच्याकडे लंडन येथे वूड क्रेसस्केन ही इमारत आहे. शिवाय दुबईमध्ये सावना ही निवासी इमारत आहे. त्यात दोघांचा वाटा प्रत्येकी ५० टक्के इतका आहे. याशिवाय पल्लवींकडे पाटो-पणजी येथील धेंपो टॉवर, आल्तिनो-पणजी येथील धेंपो व्हिला, आल्तिनो येथे बंगला, करंझाळे येथील वसंत विहार इमारतीत फ्लॅट अशी मालमत्ता आहे. त्यांचे पती श्रीनिवास धेंपो यांच्याकडे साळ-गोवा, पानेरी-तामिळनाडू, गुमिडीपुंडो-चेन्नई येथे कृषी जमिनी, मिरामार-पणजी, सुकूर येथे बिगर कृषी जमिनी, पाटो-पणजी येथे धेंपो टॉवर्स, तसेच मिरामार येथे सोनाटा ही निवासी इमारत असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून आले आहे.
विरियातोंकडे कृषी जमीन नाही!
काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी प्रतिज्ञापत्रातून आपल्या नावे त्यांच्या नावे कृषी जमीन तसेच व्यावसायिक इमारत नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फ्लॅट, जमीन अशा स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १.२३ लाख रुपये आहे.             

हेही वाचा