Covishield मुळे आरोग्य धोक्यात... Covaxin घेतलेल्यांनी घेतला मोकळा श्वास; पहा मीम्स

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th April, 02:14 pm
Covishield मुळे आरोग्य धोक्यात... Covaxin घेतलेल्यांनी घेतला मोकळा श्वास; पहा मीम्स

पणजी : Covishield लस घेतलेल्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, अशी कबुली खुद्द ही लस बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात दिल्याने खळबळ माजली आहे. या वृत्तानंतर Covaxin लस घेणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आता याच विषयावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

Covishield लस घेतलेल्या लोकांमध्ये वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवताना दिसू लागल्या आहेत. पण, असे दुष्परिणाम फार कमी लोकांमध्ये दिसून येत आहेत, अशी कबुली कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात दिली आहे. या कबुलीनंतर ही लस घेणारे लोक चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, लोक सोशल मीडियावर मीम्स देखील शेअर करत आहेत.

वास्तविक, ब्रिटनचा एक रुग्ण जेमी स्टॉक याच्या मेंदूत आजार निर्माण झाला आहे. त्याच्यात थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमने ग्रस्त आहे. जेमीने दावा केला की कोविशील्ड लस घेतल्यानंतर तो आजारी पडला. यानंतर ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आणि आता त्यावर सुनावणी सुरू आहे. ॲस्ट्राझेनेक कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम दिसू शकतात. काही लोकांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या जमा होत आहेत. मात्र, या लसीमुळे कोणताही मोठा किंवा जीवघेणा आजार होऊ शकत नाही, असेही कंपनी म्हटले आहे.