एड. रमाकांत खलपांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th April, 04:48 pm
एड. रमाकांत खलपांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता!

पणजी : काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आपल्याकडे सुमारे ६.२२ कोटींची मालमत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, खलप यांच्या पत्नी निर्मला खलप यांच्याकडे सुमारे ११.५३ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.

अॅड. खलप यांच्या बचत खात्यांमध्ये १.०७ कोटी रुपये आहेत. बाँड्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये त्यांची ४५ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे ३.६० लाखांची वाहने आहेत. तर, ३.४७ कोटींची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी निर्मला खलप यांच्याकडे गुंतवणूक, बँक खाती, सोने व इतर मिळून ४.९२ कोटी, तर ६.६१ कोटींच्या जमिनी अशी मिळून ११.५३ कोटींची मालमत्ता असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर काँग्रेस उमेदवारांनी बुधवारी रामनवमीचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज सादर केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, ​विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह इंडि आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख दोन्ही उमेदवारांचे​ अर्ज सादर करताना उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या तिसऱ्या पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार रुबर्ट परेरा गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

हेही वाचा