अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, कारची ट्रेलरला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 04:20 pm
अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, कारची ट्रेलरला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस वेवर एक मोठा अपघात झाला आहे. याठिकाणी ट्रेलरला मागून धडक दिल्याने कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. 

नडियादजवळ ही घटना घडली

अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्गावरील नडियादजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला आणि महामार्ग जाम झाला. अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि एक्सप्रेस हायवे गस्ती पथकही घटनास्थळी पोहोचले.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा