गृहमंत्रालयात आगीची घटना; झेरॉक्स मशीन, संगणक आणि कागदपत्रे जळून खाक

-गृह मंत्रालयाच्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी ९.२० च्या सुमारास आगीची घटना घडली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ९.३५ च्या सुमारास आग आटोक्यात आणली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th April, 04:12 pm
गृहमंत्रालयात आगीची घटना; झेरॉक्स मशीन, संगणक आणि कागदपत्रे जळून खाक

नवी दिल्ली :  केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या (MHA) कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी आग लागली. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

ही माहिती देताना अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि सकाळी ९.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.

एसी युनिटपासून सुरू झालेली आग कागदपत्रांपर्यंत पोहोचली.

 वृत्तानुसार आग एसी युनिटमधून लागली. या घटनेत एसी, झेरॉक्स मशिन, काही संगणक आणि काही कागदपत्रांसह पंखेही आगीने जळून खाक झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या कार्यालयात ही आग लागली ते आयकर विभागाचे कार्यालय असल्याचे सांगण्यात आले. रिपोर्टनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग आधी एसीमध्ये लागली आणि नंतर हळूहळू पसरली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते, परंतु अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते. 

हेही वाचा