म्हापशाच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांचा राजीनामा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th February, 12:22 am
म्हापशाच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांचा राजीनामा

म्हापसा : येथील पालिकेच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्ताधारी गटात झालेल्या अलिखित कराराच्या आधारे मिशाळ यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. येत्या काही दिवसांत उपनगराध्यक्ष विराज फडके हे देखील पदाचा राजीनामा देणार असून नगराध्यक्षपदी नूतन बिचोलकर तर उपनगराध्यक्षपदी सुशांत हरमलकर यांची वर्णी लागणार आहे.

पालिका मंडळातील सत्ताधारी गटाने वरील नावांवर मोहर उठवली आहे. यासंदर्भात सत्ताधारी गटातील नगरसेवकांची बुधवारी ७ रोजी दुपारी सचिवालयात उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. आमदारांच्या सूचनेनुसार मिशाळ यांनी हा राजीनामा दिला. या बैठकीत सत्ताधारी गटातील १४ पैकी ११ नगरसेवक उपस्थित होते.

आमदार आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवत मला नगराध्यक्षाची जबाबदारी सोपविली होती. मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हापसावासीयांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. हा माझ्यासाठी सन्मान आहे. यापुढे प्रभाग तसेच शहरासाठी काम करीत राहिल, असे प्रिया मिशाळ यांनी सांगितले.