इथे वाचा डिसेंबर महिन्यातील जत्रांची संपूर्ण यादी...
पणजी : मंदिर प्राकारातील भक्तिमय वातावरण, लेकी-सुनांची ओटी भरण्यासाठी लगबग, पाहुण्यांची वर्दळ, खाजे, खेळण्यांची दुकाने, रात्री दशावतारी नाटके, जागर आणि पहाटेचा कालोत्सव अशा मंगलमय वातावरणाच्या जोडीला गुलाबी थंडीसह राज्यात जत्रांना सुरुवात झाली आहे. फोंडा तालुक्यातील बोरी येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या जत्रोत्सवाने सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी गोव्यातील जत्रोत्सवास प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त देवस्थानांचे पालखी उत्सव, वर्धापनदिन, दिवजोत्सव आदी कार्यक्रमांची रेलचेल असेल.
मंगळवार दि. २८ रोजी मोप-पेडणे येथील श्री सातेरी माऊली देवस्थानची जत्रा पार पडली. शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी मडकईच्या श्री नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव झाला. शनिवारी २ राेजी कोरगाव येथील श्री कमळेश्वर देवाची जत्रा, मंगळवारी ५ रोजी मुळगावच्या श्री केळबाई देवीचा कालोत्सव, बुधवारी ६ रोजी बोरी येथील श्री वेतोबाची जत्रा, शनिवारी ९ रोजी बाळ्ळी-केपे येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवीचा कालोत्सव होईल.
सोमवार ११ रोजी मुळगावच्या श्री शांतादुर्गा वेताळ देवतांची जत्रा, तुये येथील श्री भगवती कामुर्लीकरीण देवीची जत्रा, कोरगावच्या श्री साळेश्वरची जत्रा, मंगळवार १२ रोजी पार्से येथील श्री भगवती देवीची जत्रा, वळवई येथील श्री गजान्तलक्ष्मी जत्रा, मळकर्णे येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानची जत्रा, गुरुवार १४ रोजी श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थान-नानोडा आणि मदनंत देवस्थान, सावईवेरे येथे जत्रा, शुक्रवार १५ रोजी तुये येथील श्री भवानी देवीची जत्रा, शनिवारी १६ रोजी मापा पंचवाडी येथील कलनाथ देवस्थानची जत्रा, खार्ली-म्हापसा येथील श्री सातेरी देवीचा कालोत्सव होणार आहे.
सोमवार १८ राेजी श्री सातेरी देवस्थान, चांदेल-पेडणे येथे जत्रा, शेळवण-केपे येथील श्री सातेरी पंचिष्ठान देवस्थानचा कालोत्सव मंगळवार दि. १९ रोजी, बुधवार २० राेजी कोठंबी-केपे येथील श्री महादेव, काेरगाव येथील श्री भूमिका, धारगळ येथील श्री शांतादुर्गा आणि माशेल येथी श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण देवीचा जत्रोत्सव तथा कालोत्सव, शुक्रवार २२ राेजी मराठवाडा-मांद्रे येथील श्री सातेरी देवस्थानची जत्रा, सोमवार २५ रोजी श्री शांतादुर्गा कलंगुटकरीण देवस्थान-नानोडा, बुधवार २७ रोजी पाळी कोठंबी येथील श्री चंद्रेश्वर देवाचा कालोत्सव, कांदोळीतील श्री शांतादुर्गा कालोत्सव, रविवार ३१ रोजी आगरवाडा-पेडणे येथील श्री सातेरी देवस्थानचा जत्रोत्सव होणार आहे.