कमाईत ‘बार्बी’ ४ हजार कोटींच्या दिशेने

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th July 2023, 06:44 pm
कमाईत ‘बार्बी’ ४ हजार कोटींच्या दिशेने

ग्रेटा गेरविगचा चित्रपट ‘बार्बी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रत्येक दिवसागणिक हा हॉलिवूड चित्रपट नवनवे विक्रम रचत आहे. मंगळवारच्या कलेक्शनच्या बाबतीत क्रिस्तोफर नोलन आणि टॉम क्रूझ यांच्या चित्रपटाला मागे टाकणारा हा चित्रपट आता ४ हजार कोटींकडे वेगाने वाटचाल करत आहे.
ओपनहायमरनंतर या चित्रपटाने टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' या चित्रपटालाही जगभरात कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर 'बार्बी' हा चित्रपट दररोज नवे रेकॉर्ड बनवत आहे.
'बार्बी'ची भारतात कमाई मंदावली
२१ जुलै २०२३ रोजी ओपेनहायमर आणि बार्बी दोघेही थिएटरमध्ये आले. मात्र, ओपेनहायमर भारतात इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला, पण 'बार्बी' फक्त इंग्रजीत प्रदर्शित झाला. 'ओपेनहायमर' आणि 'बार्बी' या भारतीय कलेक्शनची तुलना केली, तर भारतात ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटाचा वरचष्मा आहे.
बार्बीच्या भारतीय कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने बुधवारी भारतात २.२७ कोटींची कमाई केली. ग्रेटा गेरविग दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण २५.५२ कोटींचे कलेक्शन केले आहे.
'बार्बी'चा जगभरात धुमाकूळ
मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिन स्टारर चित्रपट भारतात भले संथ असेल, पण जगभरात हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर ओपेनहायमरला आधीच हरवले आहे. सहा दिवसांत हा चित्रपट जगभरात झपाट्याने ४ हजार कोटींपर्यंत पोहोचत आहे.