राय ग्रामसभेत साडेसहा कोटींच्या शिलकी अर्थसंकल्पाला मंजुरी

खुल्या जागांचा विकास करण्याचा मुद्दा चर्चेला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:18 am
राय ग्रामसभेत साडेसहा कोटींच्या शिलकी अर्थसंकल्पाला मंजुरी

मडगाव : राय पंचायतीच्या ग्रामसभेत सुमारे सहा कोटी ४० हजारांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मागील ग्रामसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली गेली नव्हती. रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या काही मागण्या मान्य केल्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

या अर्थसंकल्पात काही नवी विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायतीनजीकच्या मैदानाचे काम यावर्षीच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले आहे. याशिवाय पंचायतीच्या इमारतीचा काही भाग हा नूतनीकरणासाठी घेण्यात येणार आहे. युवकांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी काही निधीची तरतूद केलेली आहे. ग्रामसभेत सुमारे सहा कोटी ४० लाखांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. यातील काही निधीची तरतूद ग्रामस्थांच्या मागणीनुसार कमीजास्त करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच जुडास क्वाद्रोस यांनी दिली.

याशिवाय ग्रामसभेत काही खुल्या जागांचा विकास करण्याचा मुद्दा चर्चेला आला. या चर्चेवेळी पंचायत परिसरातील खुल्या जागांचे सुभोभिकरण व विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे त्याबाबत काही माहिती आहे का, याबाबत विचारणा केली असता, पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचायतीकडून योग्य माहिती गोळा केल्यानंतर व आवश्यक अभ्यासानंतर पुढील कामे करण्याचे ठरवण्यात आले. 

हेही वाचा