धनुषचा ‘वाथी’ १०० कोटींच्या क्लबमध्ये


09th March, 11:03 pm
धनुषचा ‘वाथी’ १०० कोटींच्या क्लबमध्ये

साऊथचा स्टार अभिनेता धनुषचा चित्रपट 'वाथी' म्हणजेच ‘सर’ बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. कोणत्याही विशेष प्रमोशनशिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला. १७ फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे 'वाथी'ची कथा?
चित्रपटाची कथा १९९० मध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात उभ्या असलेल्या एका माणसाची आहे. चित्रपटात धनुष एका प्राध्यापकाची भूमिका साकारत आहे जो शिकवण्याची पद्धत बदलतो. तमिळ आणि तेलुगूमध्ये बनलेला हा द्विभाषिक चित्रपट खूप चर्चेत आहे. वेंकी अटलुरी दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ आणि तेलुगूमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला.
तमिळ आवृत्तीमध्ये ‘वाथी’ असे नाव असताना, चित्रपट तेलुगू भाषेत ‘सर’ म्हणून प्रदर्शित झाला. आठवड्याच्या शेवटी, निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि १०० कोटी क्लबमध्ये सामील झाल्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली. धनुषने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चाहत्यांचे आभारही मानले आहेत.