मृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा!

अॅड. शैलेश कुलकर्णी यांचे प्रतिपादन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:08 am
मृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा!

ज्येष्ठ नागरिकांसोबत अॅड. शैलेश कुलकर्णी व इतर.

फोंडा : आपल्या पुढील पिढीचा त्रास वाचवण्यासाठी आपलाही मनस्ताप होऊ नये, यासाठी मृत्यूपत्र करा आणि निर्धास्त व्हा, असा मौलिक सल्ला अॅड. शैलेश कुलकर्णी यांनी दिला.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने प्राेबस-फाेंडा या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेसाठी ‘अॅक्सीयम लिगल सर्व्हिसेस, फाेंडा’तर्फे ‘मृत्यूपत्र आणि गाेव्याचे कायदे’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली हाेती. या कार्यक्रमात अॅड. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमात खास निमंत्रितांमध्ये शांतीनगर भागातील नगरसेविका गीताजी तळावलीकर, केतकी गडेकर या उपस्थित हाेत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राेबस फाेंडाचे अध्यक्ष अशाेक तरळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष राम परिहार यांनीही मनाेगत व्यक्त केले. केतकी गडेकर यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर विचार मांडले.
‘गाेव्यातील ‘पाेर्तुगीज सिव्हिल काेड’नुसार करण्यात येणारे मृत्यूपत्र तसेच त्याला पूरक कायदे’ या विषयावर आपल्या खुमासदार शैलीमध्ये अॅड. शैलेश कुलकर्णी यांनी उपस्थित सभासदांना अत्यंत माैलिक मार्गदर्शन केले. मृत्यूपत्र केल्याने हाेणारे संभाव्य फायदे व ते न केल्याने वारसांना हाेणारा पुढचा त्रास अार्थिक ताेशिस व काेर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या, या विषयांची अत्यंत सखाेल माहिती या कार्यक्रमात अॅड. कुलकर्णी यांनी दिली.
मृत्यूसारखा एक गंभीर विषयाला कवितेच्या माध्यमातून अगदी आल्हाददायक करण्यात सूत्रसंचालक उमेश दाणी यांचा हातखंड या कार्यक्रमात दिसून आला. अॅड. प्रतीक्षा रायतुरकर यांनी आभार प्रदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक शंकांना याेग्य कायदेशीर स्पष्टीकरण मिळल्याने कार्यक्रम खूपच दर्जेदार झाला. असे अनेक विषयांवर ज्येष्ठांसाठी कार्यक्रम करावेत, असे अशाेक तरळे यावेळी म्हणाले.

हेही वाचा