सुरीहल्ला प्रकरणात आणखी पाच जणांना अटक

नागवातील प्रकरण : आतापर्यंत १० गजाआड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:03 Hrs
सुरीहल्ला प्रकरणात  आणखी पाच जणांना अटकम्हापसा : नागवा येथे रवी शिरोडकर (रा. कळंगुट) या युवकावरील प्राणघातक सुरीहल्ला प्रकरणात हणजूण पोलिसांनी सोमवारी आणखी पाच जणांना अटक केली.

राजेश उर्फ लुडू सुरेश केरकर (३८, रा. ग्रॅण्ड मरड-साळगाव), सागर उर्फ क्षेत्रपाल संतोष पाटील (२३, रा. पर्रा), साहील रमेश पेडणेकर (२४, रा. प्राईसवाडा-नागवा), सागर वासुदेव वावलापी (३६, रा. ओर्डा-कांदोळी) व श्रमित ऊर्फ पुप्पी श्रीकांत साखळकर (२७, रा. खोटलावाडा-साळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
हल्ल्याची ही घटना शनिवारी भल्यापहाटे ३ च्या सुमारास नागवा येथे घडली होती. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी यापूर्वी मुख्य हल्लेखोर टार्झन पार्सेकर (रा. नागवा) याच्यासह शैलेश चंदू नाईक (२०, रा. तीनमाड-कामुर्ली), सिद्धान्त सूर्यकांत मांद्रेकर (२२, रा. गोलेतीनवाडा-साळगाव), अमन रोहिदास शिरोडकर (२१, रा. निगवाडा-साळगाव) व प्रशांत ऊर्फ कारू दासराजू (१९, रा. फुडलेवाडा-नागवा) यांना अटक केली होती. या सर्व संशयितांना येथील न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.