आयुष्मानचा 'डॉक्टर जी' ट्रेलर रिलीज

|
23rd September 2022, 09:57 Hrs
आयुष्मानचा 'डॉक्टर जी' ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानच्या 'डॉक्टर जी' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'डॉक्टर जी'चा ट्रेलर खळखळून हसायला लावतो. आयुष्मानचा हा चित्रपट नेहमीप्रमाणे कॉमेडीसोबत सामाजिक परिस्थितीही दाखवत आहे. 'डॉक्टर जी' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' मध्ये स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे.
आयुष्मान खुरानाच्या 'डॉक्टर जी' या चित्रपटाचा ट्रेलर सुमारे २.५५ सेकंदांचा असून ट्रेलर व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला लावू शकतो. चित्रपटात आयुष्मान खुरानाला ऑर्थो डॉक्टर व्हायचे होते, पण तो स्त्रीरोगतज्ज्ञ बनतो... पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने अनेक लोक त्याच्याकडून उपचार करून घेण्यास नकार देतात. एवढेच नाही तर ट्रेलरमध्ये प्रसूतीदरम्यान एक व्यक्ती त्याला मारहाण देखील करतो.
एक पुरूष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे त्याला आपल्या व्यवसायात किती संघर्ष करावा लागतो हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अनेक लोक त्याची पुन्हा पुन्हा खिल्ली उडवताना दिसतात. त्याचबरोबर रकुल प्रीत सिंग देखील या चित्रपटात लेडी डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील आयुष्मानचे डायलॉग्सही जबरदस्त आहेत, जे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.