कळंगुटमध्ये ५ लाखांचे कोकेन जप्त

नायजे​रियन फिलिप ओबी यास अटक


06th August 2022, 01:07 am
कळंगुटमध्ये ५ लाखांचे कोकेन जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : नायकावाडा कळंगुट येथे पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी फिलिप ओबी (३४) या नायजेरियन नागरिकास अटक केली व त्याच्याकडून ५ लाखांचा ५० ग्रॅम कोकेन हस्तगत केले. गेल्या तीन दिवसांतील कळंगुट पोलिसांची ही दुसरी ड्रग्जविरोधी कारवाई आहे. शुक्रवारी ५ रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली.

नायकावाडा येथील लिटल हॉटेल जवळ अमली पदार्थाचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी तेथे ग्राहकाच्या शोधात आला असता. त्यास पोलीस पथकाने पकडले यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५० ग्रॅम कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत ५ लाख रूपये आहे.

पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर रामानन, उपनिरीक्षक विराज नाईक, हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्सटेबल अमीर गरज, गणपत तिळोजी, गौरव चोडणकर व आकाश नाईक या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, नायकावाडा कळंगुट येथेच मंगळवारी २ रोजी पोलिसांनी लक्की ईकोमेये (४०) या नायजेरियन नागरिकास अटक केली होती. १ लाख ४० हजारांचा एमडीएमए हा ड्रग्ज त्याच्याकडून जप्त केला होता.