रोनाल्डोने मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम

|
23rd June 2022, 12:36 Hrs
रोनाल्डोने मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम

रोनाल्डो सिंग
दिल्ली :
भारताचा स्टार सायकलपटू रोनाल्डो सिंगने आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. रोनाल्डोने स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पुरुषांच्या एलिट स्प्रिंट शर्यतीच्या उपांत्यपूर्व फेरीत २०० मीटर फ्लाइंग टाईम ट्रायलमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी १०-सेकंदाचा अडथळा पार केला. मात्र, रोनाल्डो व्यतिरिक्त इतर भारतीय सायकलपटूंनी निराशा केली.
तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी, जागतिक ज्युनियर चॅम्पियन आणि आशियाई विक्रम धारक रोनाल्डो सिंग, ज्याने एक किलोमीटर टाइम ट्रायल स्पर्धेत देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकले, त्याने २०० मीटर फ्लाइंग टाइम ट्रायलमध्ये ९.९४ सेकंद पूर्ण केले. रोनाल्डोने यापूर्वी जुलै २०२१ मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे युसीआय ट्रॅक सायकलिंग नेशन्स कपमध्ये १०.१६८ सेकंदांचा वेळ नोंदवला होता. त्याने सलग दोन स्प्रिंट शर्यतींमध्ये कोरियाच्या जी वन पार्कचा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्याला कझाकिस्तानच्या आंद्रे चुगेचे आव्हान असेल.
रोनाल्डो म्हणाला, या स्पर्धेतील पुढील शर्यत माझ्यासाठी मोठा दिवस आहे. कारण मी माझ्या आवडत्या स्पर्धेत आव्हान देईन, मी भारतासाठी पदक जिंकण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न देण्यास तयार आहे. यामुळे मला आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीबद्दलही शिकायला मिळेल. दरम्यान, या स्पर्धेत भारत दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि १३ कांस्यांसह एकूण गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
अन्य भारतीय सायकलपटू ठरले अपयशी
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सहा अंतिम फेरीत एकाही भारतीय सायकलपटूला पोडियम (टॉप तीन स्पॉट्स) गाठता आले नाही. भारतीय रायडर एसो पुन्हा एकदा पुरुषांच्या स्प्रिंटची उपांत्यपूर्व फेरी जिंकण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत चुगेकडून पराभव पत्करावा लागला. हर्षवीर सिंग सेखॉनने ३० हजार मीटर शर्यतीत कोरियाचा युरो किम आणि जपानचा नाओकी कोजिमा यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली. पण, ४३ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. ज्युनियर सायकलपटू हिमांशी सिंगने ७.५ किमी स्क्रॅच शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. परंतु, नंतर धोकादायक राइडिंगच्या कारणास्तव तिला अपात्र ठरवण्यात आले.