‘भौकाल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला


20th January 2022, 09:23 pm
‘भौकाल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

एमएक्स प्लेअरची सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज ‘भौकाल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘भौकाल’चा सीझन २० जानेवारी रोजी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाला आहे. मोहित रैना पुन्हा एसएसपी सेकेराच्या भूमिकेत परतत आहे. ‘भौकाल’च्या सीझन २ मध्येही मोहित रैना पुन्हा एकदा गुन्हेगारीचा नायनाट करताना दिसणार आहे.
या सीझनमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणे, तुम्ही तो एमएक्स प्लेअरवर पूर्णपणे मोफत पाहू शकता. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एमएक्स प्लेअर अॅप असणे आवश्यक आहे.
‘भौकाल’ सीझन २ ही क्राइम थ्रिलर वेब सीरिजही असेल. याची निर्मिती बावेजा स्टुडिओने केली आहे. ‘भौकाल’ सीझन २ मध्ये जुन्या पात्रांशिवाय नवीन पात्रांचीही एन्ट्री झाली आहे. मागच्या वेळेप्रमाणे हा सीझनही दमदार असणार आहे, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. ‘भौकाल’ २ चे दिग्दर्शन जतीन वागळे यांनी केले आहे. तर त्याची कथा आकाश मोहिमेने, जय शीला बन्सल आणि जतीन वागळे यांनी लिहिली आहे.