राम चरणची एकूण संपत्ती

|
13th January 2022, 10:48 Hrs
राम चरणची एकूण संपत्ती

‘आरआरआर’ चित्रपटातून धमाल करण्यासाठी येणारा दक्षिण भारतीय चित्रपटांतील सर्वात प्रसिद्ध स्टार राम चरण हळूहळू भारताच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होत आहे. राम चरणच्या कुटुंबातील अनेक लोक फिल्मी दुनियेत काम करत आहेत. राम चरण ३६ वर्षांचा तरुण सुपरस्टार आहे. राम चरण याने अल्पावधीतच नाव कमावले आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटांचे सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा टॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. २००७ मध्ये ‘चिरुथा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या राम चरणची फॅन फॉलोइंगही त्याच्या वडिलांसारखी आहे. राम चरण २००७ मध्ये त्याच्या पहिल्या चित्रपट चिरुथासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटांव्यतिरिक्त, ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणुकीतून पैसे कमवणाऱ्या राम चरणकडे हैदराबादमधील जुबली हिल्सच्या मुख्य ठिकाणी एक आलिशान व्हिला आहे. या व्हिलाची किंमत सुमारे ३८ कोटी आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरणचे हे घर दक्षिणेतील कोणत्याही सेलिब्रिटीच्या सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.
राम चरण यांचे कोनिडेला प्रोडक्शन कंपनी नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. राम चरण याने दोन तामिळ चित्रपटांची निर्मिती केली असून 'तूफान' या तमिळ चित्रपटासाठी गाणेही गायले आहे. राम चरण यांची एकूण संपत्ती १२५० कोटी रुपये आहे. याशिवाय त्याचे वार्षिक उत्पन्न २० कोटींहून अधिक आहे. रामचरण हे हैदराबादस्थित ------ एअरलाइनचे मालक आहेत. याशिवाय रामचरण हैदराबाद पोलो रायडिंग क्लब नावाची पोलो टीमही आहे. तो ‘मा टीव्ही’च्या संचालक मंडळावर देखील आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोव्हर पासून ऑडी पर्यंत गाड्या आहेत.
राम चरणने १४ जून २०१२ रोजी अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप सी. रेड्डी यांची नात उपासना कामिनेनीशी विवाह केला. रामची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते, मात्र त्याने फक्त एकच बॉलिवूड चित्रपट 'जंजीर' केला आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रामचरण ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली' दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआरही आहे.
हैदराबादच्या सर्वात पॉश भागात असलेल्या ज्युबली हिल्समध्ये राहणाऱ्या राम चरणचा बंगला समोर आणि मागच्या दोन्ही बाजूंनी प्रेक्षणीय आहे. २०१९ मध्ये राम चरणने हा आलिशान बगला विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर राम चरणाचा हा बंगला सुमारे २५ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरला आहे. हैदराबादमध्ये बंगला असण्यासोबतच राम चरणने मुंबईतही घर घेतले आहे. जे सलमान खानच्या घराशेजारी आहे.