प्रोसेसर: IBM, AMD त्यांचे क्लोन व अन्य प्रोसेसरचे आगमन

INTELची सुरुवात धमाकेदार झाली होती, "आता अख्खं मार्केट आपलं आहे" ह्याच आविर्भावात ते वावरत होते. INTEL ४००४ याच्या तुफान यशाने बाकी स्पर्धकही जोमाने नवनवीन गोष्टी शोधत होते. याच वेळेस रॉबर्ट नोयस जे intelचे सहसंस्थापक व इंटिग्रेटेड सर्किटचे सहप्रणेते होते, ते आता intel ८००८ चे बारसे करण्याच्या तयारीत होते.

Story: टेक्नो जगतात | ऋषभ एकावडे |
04th December 2021, 11:46 pm
प्रोसेसर: IBM, AMD त्यांचे क्लोन व अन्य प्रोसेसरचे आगमन

आपल्याला भविष्याचा वेध जर घ्यायचा जर असेल तर भूतकाळातील घटनांकडेसुद्धा डोकावून बघितले पाहिजे, कारण त्या गोष्टी आपणास वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आपली सुरुवात कुठून झाली हे तेवढेच महत्त्वाचे आहे, जेवढे आपले पुढचे पाऊल. ज्यास आपला उगम कसा व कुठून झाला हे लक्षात राहते, तो आपला प्रवास थांबवत नाही.

इंटेलचे सहप्रणेते व थोर रसायनशास्त्र अन् भौतिकशास्त्र विशारद गॉर्डन मूर यांनी प्रस्थापित केलेला "Moore's law" नुसार संगणक शास्त्र आता बाळसे धरू लागले होते. १९६५ साली त्यांनी सिद्धांत मांडला "दर वर्षी transistorsची संख्या २ पट वाढून त्याचे दर हे १ पटीने कमी होणार. ( हा ढोबळमाने असाच सिद्धांत आहे.) जेवढे २ transistors मधील अंतर कमी, तेवढा त्याचा वेग जास्त हे सुद्धा तेव्हाच सिद्ध झाले. पुढे १९६८ रोजी intelची स्थापना झाली.

INTELची सुरुवात धमाकेदार झाली होती, "आता अख्खं मार्केट आपलं आहे" ह्याच आविर्भावात ते वावरत होते. INTEL ४००४ याच्या तुफान यशाने बाकी स्पर्धकही जोमाने नवनवीन गोष्टी शोधत होते. याच वेळेस रॉबर्ट नोयस जे intelचे सहसंस्थापक व इंटिग्रेटेड सर्किटचे सहप्रणेते होते, ते आता intel ८००८ चे बारसे करण्याच्या तयारीत होते.

१९७०चे बहुतांश प्रोसेसर हे MOSFET ह्या तत्वावर म्हणजेच METAL OXIDE SEMICONDUCTOR FIELD EFFECT TRANSISTORS ह्या तत्वावर आधारित PMOS LOGIC ह्या प्रणाली वर चालणारे होते. पुढे १९७५-७६ मधे NMOS ह्या प्रणालीचा शोध लागला व PMOS चा वापर बंद झाला तो कायमचाच. ह्या प्रणालीत मुख्यत्वे CHIPमध्ये असणाऱ्या SODIUMचे प्रमाण हे मानकांप्रमाणे उणे करण्यात येते. यामुळे, प्रोसेसरमध्ये असणाऱ्या जवळजवळ ८५% टक्के त्रुटी ह्या कमी झाल्या त्या कायमच्याच! हा बदल क्रांतिकारी होता. हे होत असतानाच MICRALIGM SYSTEM ह्या Perkin Elmer यांच्या प्रोसेसरने आणखीनच उच्छाद मांडला. ह्यात MICRALIGM ने प्रोसेसर एक अलगद असे आच्छादन तयार केले जे त्या काळच्या प्रोसेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या व त्यामानाने काहिश्या अवजड अश्या आच्छादनापेक्षा हलके होते. या आधी, input दिल्यानंतरच्या खुणा जेव्हा इंग्रम वर टिपल्या जायच्या, त्यावर प्रक्रिया होत असताना प्रोसेसरच्या खोबणीतून PHOTORESIST नावाचे तत्व ही उखडून यायचे  ( ह्यास प्रकाश संवेदकही म्हणतात जे आजही बहुतांश electrical circuits आणि electrical application मध्ये वापरले जाते.) त्यामुळे ७०-८० टक्के प्रोसेसर हे खराब व्हायचे, ते आता बंद झाले व नुकसानीचे प्रमाण आता १०% वर आले.

MOS ६५०२ नावाचा बहाद्दर ह्याच प्रणालीवर आधारित होता.

१९७४ मधे IBM ह्या कंपनीने "टेलिफोन स्विचींग कॉम्प्युटर"  बनविण्याचा विडा उचलला तो त्या वेळेचा वाढता कम्प्युटिंग कामाचा बोजा बघून. ह्या सिस्टमचे काम एकदम सोपे होते, ह्यास फकत I/O, branches, add register-register व add register to memory  करणे एवढाच मतितार्थ होता व हळूहळू आता सगळेच जोमाने तयारीला लागले होते. जेव्हा हा ibm चा प्रोजेक्ट रद्द झाला त्यांनी नवा प्रोजेक्ट हाती घेतला. त्यांनी cheetah, the America project, power १, power २, power pc, the amazon project, power ३  ह्या अंतर्गत अनेक प्रोसेसरची निर्मिती वेळोवेळी केली.

Amd ने आपला प्रवास सुरू केला तो १९६९ साली ADVANCED MICRO Devices ह्या नावाने व १९७५ साली उतरवली आपली आधुनिक अशी AM २९०० सिरीज जी विशिष्ट व परिपूर्ण मायक्रो प्रोसेसरनी उपयुक्त अशी होती व पुढे १० वर्षांनी त्यांनी २९००० (२९K) ही सिरीज उदयास आणली, जी त्या वेळची इतर टेक्निकल परिस्थिती पाहता खरोखरच क्रांतिकारी अशी होती.

हे प्रोसेसर व मायक्रोसॉफ्ट अन् ऍपल ह्या बहुआयामी व बहुद्देशीय कंपन्यांच्या साथीने टेक्निकल जगताने १९७० सालानंतर जी प्रगती साकारली त्यास आजमितीस तोड नाही. पुढच्या भागात पाहूया ऍपल व मायक्रोसॉफ्टची भरारी.