सांगे, केपे, सासष्टी, मुरगावांत उद्या, परवा मर्यादित पाणी

साळावली १६० एमएलडी जलप्रक्रिया प्रकल्पातील देखभाल दुरुस्तीचे काम

|
28th October 2021, 12:05 Hrs
सांगे, केपे, सासष्टी, मुरगावांत उद्या, परवा मर्यादित पाणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : साळावली येथील १६० एमएलडी जलप्रक्रिया प्रकल्पातील देखभाल दुरुस्तीचे काम २९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव या तालुक्यांना २९ व ३० ऑक्टोबर रोजी मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंतच्या कालावधीत साळावली जलप्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सांगे, सासष्टी, केपे व मुरगाव या तालुक्यांना २९ व ३० ऑक्टोबर रोजी मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी देखभाल दुरुस्तीमुळे होणाऱ्या मर्यादित पाणीपुरवठ्याची नोंद घेऊन पाणी पुरवठा खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन सांगे येथील कार्यकारी अभियंत्यांकडून पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.