नौदलाच्या पाणबुड्यांची माहिती लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक


26th October 2021, 10:19 pm
नौदलाच्या पाणबुड्यांची माहिती लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक

नौदलाच्या पाणबुड्यांची माहिती लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक
नवी दिल्ली :
नौदलाच्या किलो क्लास पाणबुडीच्या अपग्रेडेशनची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने नौदलातील एक सेवारत अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अधिकार्‍यांना अटक केली आहे. या तीन अधिकार्‍यांच्या अटकेशिवाय या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच माहिती लीक करण्यामध्ये परदेशी गुप्तचर संस्थांचा सहभाग होता की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा तपास व्हाइस ऍडमिरल आणि रिअर ऍडमिरलकडून केला जात आहे, असा पुष्टी नौदलाच्या सूत्रांनी केली आहे.
गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप असलेला अधिकारी मुंबईचा असून तो नौदलात कमांडर पदावर आहे. किलो क्लास पाणबुड्या, सोव्हिएत युनियनमध्ये सोव्हिएत नौदलासाठी डिझाइन केलेल्या आणि बांधलेल्या, जगातील सर्वांत सामान्य पारंपरिक पाणबुड्यांपैकी आहेत आणि सध्या अनेक देशांच्या नौदलात सेवेत आहेत. भारतात या पाणबुड्यांचे सिंधुघोष वर्गात वर्गीकरण केले जाते. आजपर्यंत, सरकारने अशा १० पाणबुड्या विकत घेतल्या आहेत, त्या सर्वांचे गरजेनुसार अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरण झाले आहे.
सेवेवर असणारा नौदलातील अधिकारी मुंबईत कर्तव्यावर असून तेथून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती लीक झाल्याची घटना मात्र दिल्लीत घडली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले नौदलाचे अधिकारी माहिती लीक करण्याच्या इतर प्रकरणांमध्ये अटक केलेल्यांपैकी सर्ंवात वरिष्ठ असू शकतात, असेदेखील सूत्रांनी सांगितले.