तीन हजार बूथ स्वयंसेवकांनी दिल्या अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा

आपचे म्हापशात शक्तिप्रदर्शन


22nd September 2021, 12:36 am
तीन हजार बूथ स्वयंसेवकांनी दिल्या अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा

म्हापसा येथे उपस्थित बूथ स्वयंसेवक

पणजी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपली दुसरी हमी जाहीर करण्यासाठी गोव्यात आले असता, राज्यभरातील आपच्या ३ हजार बूथ स्वयंसेवकांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गोव्याच्या ११९ पंचायतींच्या स्वयंसेवकांनी म्हपसा येथे केजरीवाल यांची भेट घेऊन आप गोव्यात निवडून येईल यासाठी स्वयंसेवकांनी प्रतिज्ञा घेतली. त्यामुळे केजरीवाल यांच्या दुसऱ्या हमीमुळे स्वयंसेवकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
आम आदमी पार्टी आक्रमकपणे राज्यात काम करत असून घरोघरी पोहोचण्याचा कार्यक्रम आणि सामान्य गोवेकरांना मदत करणारे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आपने गोव्यामध्ये ३०० हून अधिक वीज आंदोलनांचे आयोजन केले आहे. तसेच ठिकठिकाणी ऑक्सिजन चाचणी केंद्रांची स्थापना केली आहे आणि ऑक्सिमीटर सेवेद्वारे घरोघरी जाऊन काम केले आहे. साथीच्या काळात आपच्या स्वयंसेवकांनी गोवेकरांना वैद्यकीय सेवेपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत सर्व काही मिळवण्यासाठी दिवस-रात्र काम केले. अलीकडेच २ लाख ९३ हजार कुटुंबांनी अरविंद केजरीवाल यांच्या मोफत २४/७ विजेच्या हमीसाठी आपला पाठिंबा नोंदवला आहे.
आपचे पंचायत स्तरावरील स्वयंसेवक प्रत्येक पक्षाच्या बूथमध्ये बूथ टीम तयार करतील. राज्यात आपचे मजबूत संघटन तयार झाल्याने भाजप आणि काँग्रेस हादरले आहे. राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री बदलून आपले अपयश लपवत आहे तसेच डॉ. प्रमोद सावंत यांनी आपच्या अनेक योजनांच्या नक्कल करण्यास भाग पाडले आहे, असे मत पक्षाने व्यक्त केले आहे.

गोव्यात आपची एक मजबूत संघटना उभी राहिली आहे. आमची टीम पंचायत क्षेत्रात तळागाळापर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येक गोवेकर, उत्तर किंवा दक्षिण गोव्यात असो आता गोव्याचे भविष्य म्हणून आपच्या समर्थनात आहेत. _राहुल म्हांबरे, आपचे गोवा संयोजक